वाडी-बाणावली येथील चोरीप्रकरणी दोन संशयितांना अटक

10 मे रोजी झाली होती चोरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: वाडी बाणावली येथे 10 मे रोजी झालेल्या चोरीप्रकरणी कोलवा पोलिसांनी बाणावलीतील दोघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अल्वा रॉड्रिग्ज यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन सादर करत चोरीप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांना अटक केली आहे.

हेही वाचाः मोरजीत चरस जप्त; पेडणे पोलिसांची कारवाई

10 मे रोजी केली होती तक्रार

तक्रारदार अल्वा रॉड्रिग्ज यांनी 10 मे रोजी कोलवा पोलिस ठाण्यात वाडी बाणावली येथील घरात चोरी झाल्याची तक्रार दिली. चोरट्यांनी घराचा दरवाजा फोडून दरवाजा, बेसिन, कमोड, बाथरुममधील शॉवर, नळ व इतर साहित्य, इलेक्ट्रिक साहित्य, किचन कॅबिनेट असं घरातील साहित्य चोरीला गेल्याचं तक्रारीत नमूद केलं. यानंतरही कोलवा पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नव्हती.

हेही वाचाः कामुर्लीत ट्रकसह रेती जप्त

कोलवा पोलिसांची कारवाई

अल्वा रॉड्रिग्ज यांनी घरफोडीच्या तक्रारीची प्रत, एफआयआरची प्रत आणि चोरीच्या घटनेचे फोटो लावून दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे 2 ऑगस्ट रोजी या घटनेबाबत माहिती मिळावी, अशी विनंती केली होती. यानंतर कोलवा पोलिसांनी या चोरीप्रकरणी संशयित केनेडी मारीओ दा कुन्हा (वय 40, रा. बाणावली), फझर फर्नांडिस (वय 37 रा. बाणावली) या दोघांना ताब्यात घेत चौकशीअंती अटक केली आहे. संशयितांकडून चोरीचे सामानही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हा व्हिडिओ पहाः Video | MIGRANT | परप्रांतीयांसाठी हे विधेयक आणल्याचा दावा फोल!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!