Goa Crime : अस्नोड्यात सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोघा संशयितांना अटक…

गुरुवारी पोलिसांनी दोघांविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली होती

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : गणेशनगर अस्नोडा येथे एका महिलेच्या गळ्यातील एक लाखांची सोनसाखळी हिसकावून नेल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अश्पाक व हुसैन (वास्को) या दोन दुचाकीस्वार संशयितांना अटक केली आहे. काल गुरुवारी पोलिसांनी या दोघा संशयित चोरांविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली होती.
हेही वाचाःPhoto Story: 41 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात रोहन खंवटेंनी दिली गोवा पॅव्हेलियनला भेट…

फिर्यादी महिला किरकोळ जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनसाखळी हिसकावण्याची घटना २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडला होती. फिर्यादी इवारिस्ता डिसोझा ही महिला अस्नोडा चर्चमधून घरी गणेशनगर येथे जात होती. ती वाड्यावर पोहोचताच स्कुटरवरून आलेल्या दोघा चोरांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली व पळ काढला. यावेळी फिर्यादी महिला किरकोळ जखमी झाली. पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वार चोरांविरुद्ध ३३६ व ३७९ कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. घटनेवेळी परिसरातील सीसीटीव्हींमध्ये संशयितांची छबी बंदिस्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयितांच्या छायाचित्रांसह लुक आऊट नोटीस जारी केली होती.
हेही वाचाःTata-bisleri Deal: ‘बिसलरी’ कंपनीची विक्री होणार? कंपनीच्या विक्रीमागे आहे ‘हे’ कारण…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!