एनसीबीच्या सलग दोन कारवाया

तिघांना अटक; तीन अधिकारी जखमी

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी:  मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील सहकाऱ्यांच्या साह्याने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस हणजुणे आणि पर्रा येथे कारवाई करून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक पद्धतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. हणजूण येथील एका आईसक्रिम पार्लरवर छापा मारून रॉक फर्नांडिस (३६) आणि त्याच्या पत्नीसह चिडी ओसिटा ओकोनकवो उर्फ बेंजामिन (४३) या नायजेरीयन नागरिकाला अटक केली आहे. तर दुसऱ्या कारवाईत ओनायेका एगिके (३६) या नायजेरीयन नागरिकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी रॉक आणि ओकोनकवो या दोघांना न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

हेही वाचाः ‘नेटवर्क’साठी वाळपईत विद्यार्थ्यांचं आंदोलन

हणजूण येथे कारवाई

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, हणजूण येथील एका दुकानात विदेशी तसंच देशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याची माहिती गुप्तहेरांनी दिली होती. तसंच त्या ठिकाणी अमली पदार्थ तस्करी होत असल्याची महिती दिली. त्यानुसार पश्चिम विभागाचे क्षेत्रीय संचालक समीर वानखडेंच्या  मार्गदर्शनाखाली गोवा विभागाचे अधीक्षक सुजीत कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या पथकाने सोमवारी सकाळी गोववाडे – हणजूण येथील सबंधित आईसक्रिम पार्लर तथा दुकानावर बनावट ग्राहक पाठवून अमली पदार्थाची मागणी केली. यावेळी त्यानुसार, बनावट ग्राहकाला दुकान मालक रॉक फर्नांडिस यांनी अमली पदार्थाची पुरवठा केला. याच दरम्यान पथकाने फर्नांडिस याला रंगेहाथ पकडलं.

हेही वाचाः पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’ रसिकांच्या भेटीला !

गेस्ट हाऊसवर छापा

त्यानंतर ज्या ठिकाणी अमली पदार्थाचा साठा ठेवण्यात आलेल्या के एस. या गेस्ट हाऊसवर छापा टाकला. त्यावेळी पथकाने ३७ एक्टेसी टॅबलेट्स आणि ३४० ग्रॅम नेपाली चरस जप्त केले. त्यानंतर पथकाने रॉक फर्नांडिस याला अमली पदार्थ पुरवठा करण्याऱ्या चिडी ओसिटा ओकोनकवो उर्फ बेंजामिन या नायजेरीयन नागरिकाला शोध घेतला. याच दरम्यान एनसीबीच्या कारवाईची त्याला मिळाली. त्यानुसार त्याने आपला ठावठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याला पाठलाग करून जेरबंद करण्यात आले. या वेळी पाठलाग करतांना एनसीबीचे तीन अधिकारी जखमी झाले.

हेही वाचाः सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज

दोघांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी

त्यानंतर एनसीबीने बेंजामिन याची झडती घेतली असता, त्याच्याकडे २३ एक्टेसी /एमडीएमए टेबलेट्स, सापडले. या प्रकरणी एनसीबीने अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करून रॉक फर्नांडिस आणि चिडी ओसिटा ओकोनकवो उर्फ बेंजामिन या दोघांना प्रथम अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांना मंगळवारी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आलं. या वेळी न्यायालयाने त्या दोघांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली. त्यानंतर याप्रकरणात सहभाग असल्यामुळे एनसीबीने मंगळवारी रॉक फर्नांडिस याच्या पत्नीला अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेले संशयित अमली पदार्थ तस्करीसाठी गुगुल पे वरून रक्कम घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचाः फेब्रुवारीत बदलीचा आदेश, पण जून संपला तरी वेर्णा पोलीस ठाण्यात शेरीफच कसे?

पर्रा येथील कारवाईत एकाला अटक

दरम्यान एनसीबीने मंगळवारी पर्रा येथे छापा टाकून आणखीन एक कारवाई केली आहे. त्यात ओनायेका एगिके (३६) या नायजेरीयन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून पथकाने २० बोल्ट एलएसडी जप्त केली आहे.    

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!