एकाच वाहनाला दोन नंबरप्लेट, नक्की काय आहे हा प्रकार? वाचा सविस्तर…

सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : नव्या पाटो पुलावर बुधवारी सकाळी एक पिकअप वाहन थांबले होते. वाहनाला दोन नंबरप्लेट दिसून आल्या. या वाहनाचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत पणजी वाहतूक पोलिसांनी वाहनाच्या मालकाला कार्यालयात बोलावून घेतले. कागदपत्रे तपासल्यावर चौकशीअंती हा गोंधळ उघड झाला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
हेही वाचाःGoa Crime: १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक…

चौकशीअंती गोंधळ उघड

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी एक पिकअप वाहन नव्या पाटो पुलावर थांबले होते. यावेळी त्या वाहनाच्या मागील नंबरप्लेटवर दुसरी नंबरप्लेट म्हणजेच एक नंबर कर्नाटकमधील आणि दुसरा गोव्यातील असल्याचे दिसून आले. या वाहनाचा सोशल मिडियावर फोटो व्हायरल होताच खुद्द मुख्यमंत्री कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली. यानंतर पणजी वाहतूक पोलिसांनी वाहनाच्या मालकाला कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी कागदपत्रे तपासल्यावर चौकशीअंती हा गोंधळ उघड झाला. हे वाहन एका बांधकाम कंपनीचे असून त्याची पुर्ननोंदणी गोव्यात केल्याची माहिती वाहतूक खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचाःNational Press Day : राजधानी पणजीत पत्रकार भवन उभारण्याचा विचार…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!