राज्यात पुन्हा अल्पवयीन मुलींवर बलात्कार, पोलीस असल्याचा बहाणा करत अत्याचार

पोलिसांत तक्रार दाखल, अधिक तपास सुरु

अजय लाड | प्रतिनिधी

मडगाव : राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या, बलात्काराच्या आणि अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं वेगवेगळ्या घटनांवरुन समोर आलं होतं. दरम्यान, आता पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

कधीची घटना?

बाणावली येथील समुद्र किनारी दोघा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली आहे. रविवारी रात्री कोलवा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी चोघांना ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतलेल्या चारही संशयित आरोपींची सध्या कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळतेय.

हेही वाचा : Rape | Crime | गरोदर राहिल्यानंतर 14 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर

GangRape 800X450

ही घटना घडली आहे २४ जुलै रोजी संध्याकाळी. शनिवारी संध्याकाळी दोघा अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करण्यात आला. यात संशयितांनी पोलीस असल्याचा बहाणा करत मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच संबंधित मुलींसोबत असणाऱ्या दोघा मित्रांनादेखील मारहाण करण्यात आल्याचं म्हटलंय.

हेही वाचा : धक्कादायक! 6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, 21 वर्षीय तरुणाला अटक

…म्हणून प्रकार उघडकीस

रविवारी संशयितांनी पीडित मुलींकडे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली सुरु केली होती. त्यानंतर पीडित मुलींनी हिम्मत करत कोलवा पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर देण्यात आलेल्या तक्रारीवरुन हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय. दरम्यान, एकूण या घटनेनं पुन्हा एकदा राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बाणावली समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!