मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी दोघांना तुरुंगवास…

मसाज पार्लरच्या नावाखाली करत हाेते गैरकृत्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : कोलवा येथील किनारी भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सूरज शर्मा (वय ३२, केपे) व संतोष सोनावणे (वय ३२, रा. पुणे, महाराष्ट्र) यांना वेश्याव्यवसाय व मानवी तस्करीप्रकरणी दोषी ठरवत दोघांना तुरुंगवास व दंड ठोठावला आहे.
हेही वाचा:नेपाळ सिमेजवळ आवळल्या मुसक्या…वाचा ‘नूर अहमद’ नेमकं प्रकरण आहे तरी काय?

वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या पाच पीडितांची सुटका

आरोपपत्रानुसार, ६ फेब्रुवारी २०२१ रोजी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवण्याचा हा प्रकार उघड झाला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकत वेश्याव्यवसायासाठी आणण्यात आलेल्या पाच पीडितांची सुटका केली. वेश्याव्यवसायातून कमावलेल्या पैशांवर संशयित मौजमजा करत होते. त्यामुळे संशयितांना जामीन मिळाल्यास या प्रकरणाच्या निकालावर परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयात दाखल दोन्ही संशयितांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते.
हेही वाचा:TECNO भारतात घेऊन येत आहे पहिला मल्टी कलर चेंजिंग स्मार्टफोन…

दोन्ही संशयितांना दोषी ठरवून त्यांना कारावासाची शिक्षा

गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना व उपअधीक्षक सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश गावडे यांनी या प्रकरणी तपास केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयात दोन्ही संशयितांना दोषी ठरवून त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शासनाच्यावतीने ॲड. सामंत यांनी बाजू मांडली.
हेही वाचा:कर्तव्य बजावताना अग्नीशमन दलाच्या फायर फायटरचा मृत्यू…

अशी सुनावली शिक्षा

न्यायालयाकडून संशयित सूरज शर्मा याला वेश्याव्यवसायप्रकरणी ८ वर्षांचा साधा कारावास, ५० हजारांचा दंड व दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची कैद सुनावली आहे. याशिवाय शर्मा यालाच मानवी तस्करीप्रकरणी विविध कलमांतर्गत सहा वर्ष दोन महिने सश्रम कारावास व दंड सुनावण्यात आलेला आहे. तर संशयित संतोष सोनावणे याला तीन वर्षै सश्रम कारावास व दोन हजाराचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास एका महिन्याची साधी कैद सुनावण्यात आली आहे.       
हेही वाचा:ड्रग्ज प्रकरणी ‘हिलटॉप’च्या स्टीव्ह डिसोझाला तेलंगणा पोलिसांकडून अटक…

    

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!