हृदयद्रावक! जावयापाठोपाठ सासऱ्यानेही सोडला प्राण…

अवघ्या १२ तासांच्या फरकात घरातील दोघांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : जावयापाठोपाठ सासर्‍याचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. जावयाचा मृत्यू झाल्यानंतर रक्तदाब वाढल्यानं सासर्‍याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 12 तासांच्या अंतरानं दोघांचाही मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचारांचे शुल्क निश्चित

कांबळेगल्ली-कणकवलीमधील रहिवासी त्रिलोक दत्तात्रय सोळसकर (७०) यांचे शुक्रवारी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने काही दिवसांपूर्वी जिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

सरकारला फक्त गोंयकारांची मतं हवीत, गोंयकारांचा जीव महत्त्वाचा नाही

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी त्यांचे जावई राजेश धुरी यांचे निधन झाले होते. त्यांच्यापाठोपाठ अवघ्या १२ तासांच्या फरकाने सासऱ्याचे निधन झाल्याने सोळसकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचारांचे शुल्क निश्चित

या दुःखद घटनेचे वृत्त कांबळे गल्ली परिसरात समजताच अनेकांचे डोळे पाणावले. सोळसकर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातू असा परिवार आहे

जीएमसीत ओपीडीसाठी आता फोनवर घेता येणार अपॉइंटमेंट?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!