बाणावली बलात्कार प्रकरणी दोन आरोपपत्रे दाखल

पणजी महिला पोलिसांकडून बुधवारी आरोपत्र दाखल; दक्षिण गोवा सत्र न्यायालय तसंच पणजी बाल न्यायालयात दोन वेगवेगळी आरोपपत्रे

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: बाणावली किनार्‍यावर दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पणजी महिला पोलिसांनी दक्षिण गोवा सत्र न्यायालय तसेच पणजी बाल न्यायालयात दोन वेगवेगळी आरोपपत्रे बुधवारी दाखल केली आहेत.

बाणावली समुद्र किनाऱ्यावर चार संशयितांकडून दोन मुलींवर बलात्कार

बाणावली समुद्र किनार्‍यावर चार संशयितांकडून पोलीस असल्याचे भासवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला होता. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी असिफ हटेली (२१, रा. हाउसिंग बोर्ड, मडगाव), राजेश माने (३३, झरीवाडा, दवर्ली), गजानन चिंचणकर (३१, झरीवाडा, दवर्ली), नितीन यब्बल (१९, रा. झरीवाडा, दवर्ली) या संशयितांना अटक केली होती.

त्यानंतर हे प्रकरण पणजी महिला पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!