राज्यातील पैरा, खारेबांध नदीत सापडले दोन मृतदेह

गुरुवारची घटना; मृतदेहांची ओळख पटवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा/मडगाव: राज्यात गुरुवारी खोर्जुवेतील पैरा आणि मडगावातील खारेबांध नदी पात्रात दोन अज्ञात मृतहेद सापडले आहेत. पैरा नदीत सापडलेला मृतदेह हा महिलेचा असून खारेबांध नदीत सापडलेला मृतदेह पुरुषाचा असल्याचं समजतंय. दोन्ही मृतदेह अग्निशमन दलाकडून कुजलेल्या अवस्थेत पाण्याच्या बाहेर काढण्यात आलेत.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशातील कोरोना मृत्यू 4 लाखांच्या पार

पैरा नदीत सापडला महिलेचा मृतदेह  

पैरा नदीत सापडलेला मृतदेह हा महिलेचा असल्याचं समजतंय. हा मृतदेह पूर्णपणे कुजल्यामुळे ओळख पटण्यापलिकडे होता. म्हापसा पोलिसांनी सदर मृतदेह शवविच्छदनेसाठी पाठवून दिला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यू मागचं कारण स्पष्ट होणार आहे. या मृत महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिस करत असून नदी किनारील भागातील एखादी महिला बेपत्ता असल्यास तिची माहिती देण्यासाठी संपर्क साधावा, असं आवाहन म्हापसा पोलिसांनी केलं आहे.

हेही वाचाः मांद्रेतील उमावती गडेकरांच्या घराविषयी ‘जैसे थे’चा आदेश

खारेबांध नदीपात्रात सापडला पुरुषाचा मृतदेह

खारेबांध येथील नदीपात्रात अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला हे समजताच नगरसेवक महेश आमोणकर यांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं. नदीपात्रात आढळून आलेला हा मृतदेह बाणावली नदीपात्रातून वाहून आलेला असण्याची शक्यता असल्याने कोलवा पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. कोलवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. यावेळी हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटलेली नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!