अमली पदार्थ प्रकरणी उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

संशयितांकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचा १ किलो १६४ ग्रॅम गांजा जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: येथील शहर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी आणि सेवन प्रकरणी दोन ठिकाणी छापा मारून उत्तर प्रदेश येथील सुरेश कुमार राम (२८) आणि जितेंद्र सिंग (२२) या दोघा संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचा १ किलो १६४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

मंगळवारी मारला छापा

गुप्तहेरांच्या माहितीवरून उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना आणि उपअधीक्षक संतोष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या नेतृताखाली उपनिरीक्षक बाबलो परब, संकेत पोखरे, पोलीस कॅन्स्टेबल परेश बुगडे, आदित्य म्हार्दोळकर, गौरव घाडी, उपेंद्र डिचोलकर, विकास नाईक, राजू नाईक आणि श्रीधर तारी या पथकाने मंगळवारी पणजी येथील कदंब बस स्थानक आणि मिरामार येथे अमली पदार्थ प्रकरणी छापा मारला. यावेळी पथकाने सुरेश कुमार राम या संशयि ताकडून ५५ ९ ग्रॅम तर जितेंद्र सिंग या संशयिताकडून ६०५ ग्रॅम मिळून १ लाख १० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे.

संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांना रीतसर अटक केली आहे.

हा व्हिडिओ पहाः MOST POWERFULL CONTRACTOR| पॉवरफुल्ल हायवे कंत्राटदाराची दादागिरी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!