गिरी येथे दुकानात चोरी; दोघांना अटक

9 जुलैची घटना; म्हापसा पोलिसांची कारवाई; चोरीचा माल पोलिसांकडून जप्त

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः राज्यात चोरीचे प्रकरणे वाढत असताना गिरी म्हापसा येथे असाच एक प्रकार घडलाय. गिरी येथे दुकान चोरी प्रकरणी म्हापसा पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आलीये. संशयीत चोरी करण्यासाठी गोव्यात आले होते. पण पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावलाय.

हेही वाचाः जीएसटीचे नेमके प्रकार किती? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

9 जुलै रोजी गिरीतील दुकान फोडलं

9 जुलै रोजी माडेल थिवी येथील 22 वर्षीय सुनील लक्ष्मण लमाणी यांनी म्हापसा पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या गिरी येथील ‘तारामती जनरल स्टोअर्स’मध्ये चोरी झाल्याची तक्रार केली होती. अज्ञात व्यक्तीने दुकानाचा ताळा तोडून दुकानात चोरी केली. या चोरीमध्ये 25 सिगारेटची पॅकेट्स, 10 चॉकलेट्सचे पॅकेट्स, हॅंड सॅनिटायझरच्या 8 बाटल्या, तेलाच्या 6 बाटल्या, 128 शॅम्पूची पाकिटं, कोल्डड्रींक्सच्या 10 बाटल्या, लेझर ब्लेड्सची 12 पीस, 100 पानी 12 वह्या, 200 पानी 12 वह्या तसंच 22 हजार रुपये रोख असं सगळं मिळून जवळपास 40 हजारांचा माल चोरीला गेल्याची तक्रार लमाणी यांनी नोंदवली.

दोघांना अटक

तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर म्हापसा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. स्थानिक लोकांशी चौकशी करून आणि तांत्रिक टेहळणीद्वारे माहिती मिळवल्यानंतर पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले. बरेच प्रयत्न केल्यानंतर कुचेली-म्हापसा येथे पांढऱ्या रंगाच्या मारुती अल्टो कार (एमएच-09-एबी-5845) ला अडवण्यात आलं. तसंच संशयीत विशाल शिरखाने (५१, कोल्हापूर) आणि विकास केसरकर (३२, बेळगाव) यांना ताब्यात घेण्यात आलं. कारची झडती घेतली असता कारमध्ये चोरीचा माल सापडला. त्याचसोबत एक स्कॅबर चाकू, हूक असलेली एक लोखंडी सळी सापडली, ज्याचा उपयोग करून संशयित दुकानं फोडायचे. म्हापसा पोलिसांच्या चौकरी दरम्यान संशयितांनी वरील चोरीत त्यांचा हात असल्याचं कबूल केलं आहे.

हेही वाचाः Video | अप्रतिम कॅच पाहून आनंद महिंद्राही म्हणाले, ही तर सुपरवुमन

संशयित आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी

संशयित आरोपींनी म्हापसा, हणजुण, कळंगुट, पर्वरी जुने गोवा या ठिकाणी फेरफटका मारला होता. पावसाची संधी साधून वरील परिसरात चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. संशयितांना गजाआड केल्यामुळे संभाव्य चोरी प्रकार टाळण्यात पोलिसांना यश आलं आहे. या तपास मोहिमेत पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, पोलिस कॉन्स्टेबल अभिषेक कासार आणि पोलिस कॉन्स्टेबल अक्षय पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संशयित आरोपींना 10 जुलै रोजी म्हापसा न्यायालयात सादर करण्यात आलं. म्हापसा न्यायालयाने संशयित आरोपींना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः VIDEO VIRAL | ऐकावे ते नवलच! वधूच्या डोक्यावर तोडले जातात पापड

या प्रकरणातील पुढील तपास म्हापसा पोलिस इन्पेक्टर तुषार लोटलीकर आणि म्हापसा पोलिस उपअधिक्षक गजानन प्रभू देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विभा वळवईकर करत आहेत.

हा व्हिडिओ पहाः Video | RESERVATION | एसटी दर्जापासून वंचित ठेवण्यामागे कोणाचा हात?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!