दुचाकी चोरीप्रकरणी दोघांना अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी
फोंडा: तिस्क – उसगाव येथील दुचाकी चोरीप्रकरणी दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्योतिबा मनोहर बिडीकर (वय ३३, सिद्धेश्वरनगर तिस्क उसगाव) आणि दीपक पांडुरंग मंडेगाळकर (वय २८, कसलये तिस्क – उसगाव) अशी संशयितांची नावं आहेत.
हेही वाचाः रविवारी साखळीत काँग्रेसची ‘सद्बुद्धी यात्रा’
26 जूनला झाली होती चोरी
गेल्या २६ जूनला तिस्क – उसगाव येथे ठेवलेली आपली स्कूटर चोरी झाल्याची तक्रार फोंडा पोलिसांत नामदेव गिनगिने यांनी दिली होती. दोन दिवसांपूर्वी तिस्क येथे एक जळालेली स्कूटर सापडली होती. या स्कूटरच्या चॅसिस क्रमांक पाहिल्यावर तो चोरीच्या स्कूटरचा असल्याचं निष्पन्न झाल्यानं शेवटी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तपासावरून फोंडा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचाः कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या संमिश्र डोसबाबत चाचण्यांचा परवानगी द्या
रागाच्या भरात स्कूटर पेटवली
चौकशी केली असता मंडेगाळकर याने रागाच्या भरात स्कूटर पेटवून दिल्याचं सांगितलं. याकामी त्याला बिडीकर याने साथ दिल्याचंही सांगण्यात आलं. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात आलं.