कोकण रेल्वे पोलिसांकडून दोघांना अटक

विजयकुमार यादव यांचा मोबाईल आणि कागदपत्रे चोरली

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: रेल्वे स्थानकावर विजयकुमार यादव यांचा मोबाईल व कागदपत्रे चोरी केल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल व इतर साहित्यही जप्त केले. 

८ हजार रुपयांचा मोबाईल आणि पाकिटाची चोरी

माजोर्डा कोकण रेल्वे क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या विजय कुमार यांचा सुमारे ८ हजार रुपयांचा मोबाईल व ड्यूटीपास, आयकार्ड, आरसी बुक, वाहन परवाना, आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम व ७०० रुपये असलेले पाकीट २२ रोजी रात्री ८ च्या सुमारास मडगाव रेल्वे स्थानकावरून चोरीला गेले होते. 

दोघांना अटक

कोकण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंद करून केलेल्या चौकशीवेळी राकेशकुमार गुंजल (२८, रा. हुबळी – कर्नाटक) व गंगाधर वडार (२८, रा. आके – मडगाव) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतल्यावर चोरीला गेलेले साहित्य त्यांच्याकडे आढळून आले. या प्रकरणी दोन्ही संशयितांना कोकण रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!