मगोपकडून दोन तास नव्हे, चोवीस तास इंटरनेट सेवा

मगोप नेते जीत आरोलकरांकडून घोषणा; मोरजी येथील विद्याप्रसारक हायस्कूलच्या सभागृहात कार्यक्रमात केली घोषणा

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पणजीः विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी किंवा भवितव्याशी कुणी खेळू नये. किंवा त्यात राजकारण घुसवू नये. सरकारला विद्यार्थ्यांना सुविधा पुरवणं जमत नसेल, तर ते काम आम्ही करू. समाजसेवक करत असलेल्या कार्याचं स्वागत करण्याऐवजी त्यावर टीका करणाऱ्यांनी अगोदर चोवीस तास सेवा उपलब्ध करून द्यावी. केवळ दोन तास इंटरनेट सेवा देऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असं आवाहन मगोचे नेते जीत आरोलकरांनी केलं. मोरजी येथील विद्याप्रसारक हायस्कूलच्या सभागृहात विद्यार्थ्यांसाठी चोवीस तास मोफत वायफाय सेवेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

हेही वाचाः किरणपाणी-आरोंदा नाका दोन्ही राज्यातील नागरिकांसाठी खुला

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन

मोरजी विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सभागृहात मंगळवारी आयोजित कार्यक्रमात मोरजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्राम शेटगावकर, मुख्याध्यापक दिलीप मेथर, सचिव प्रकाश शेटगावकर, संतोष शेटगावकर, उदर्गत संस्थेच्या मांद्रे मतदार महिला अध्यक्ष वंदना शेटगावकर, मोरजी अध्यक्ष प्राची भिवशेट, अनंत शेटगावकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय सावंत, सदस्य संजय दाभोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचाः लखनऊमध्ये भररस्त्यात तरुणीची कॅब चालकाला मारहाण

दोन तास नव्हे, तर चोवीस तास इंटरनेट सेवा कार्यरत

आरोलकर पुढे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांचं शिक्षण इंटरनेट अभावी राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. सरकार ही सेवा उपलब्ध करण्यात अपयशी ठरलं. मात्र काही सामाजिक कार्यकर्त्ये तसंच मागो पक्ष विद्यार्थ्यांना ही सेवा पुरवत आहेत, तर राजकर्त्यांच्या पोटात का दुखतं? असा सवाल आरोलकरांनी उपस्थित केला. मागोतर्फे दोन तास नव्हे, तर चोवीस तास सेवा कार्यरत केली आहे. त्याचा लाभ घेऊन चांगलं शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावं, असं आवाहन आरोलकरांनी केलं.

हेही वाचाः मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्सचे ५ ऑगस्ट रोजी उद्घाटन

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि स्वागत सुरज नाईक यांनी केलं. तर गुंजन शेटगावकर, विक्रम शेटगावकर, स्वाती परब आदींनी पाहुण्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. तर कार्यक्रमाच्या शेवटी वंदना शेटगावकर यांनी आभार मानले.

हा व्हिडिओ पहाः Video | FISHING | मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे निर्देश

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!