बारावीचा निकाल 18 जुलैला? पालक विद्यार्थी संभ्रमात

गोवा बोर्डाच्या बारावीच्या निकालाची विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: दहावीच्या निकालानंतर बारावीचा निकाल कधी लागणार, याची पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. अशातच दोन दिवसांत बारावीचा निकाल लागणार असल्याच्या शक्यतेमुळे शुक्रवारी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला. शनिवारी बारावीची निकाल लागणार आहे की काय, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (जीबीएसएचएसई) 12 वी 2021 च्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी आहे. गोवा बोर्डाच्या बारावीच्या निकालाची विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 12 वीचा निकाल 18 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार मंडळाच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचाः फुटीरतेला प्रोत्साहन देणं, घोडबाजार करण्याचं भाजप सरकारचं धोरण उघड

मात्र गोवा बोर्डाच्या 12वी च्या निकालाच्या तारखेसंदर्भात अद्याप मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आलेली नाही. वेबसाइटवर निकालाची तारीख लवकरच जाहीर होणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर भेट देणं आवश्यक आहे. निकालाशी संबंधित कोणतीही अधिसूचना gbshse.info वर प्रसिद्ध केली जाईल.

हेही वाचाः ‘जस्ट डायल’चा ताबा रिलायन्स व्हेंचर’कडं ; तब्बल ३४९७ कोटींना खरेदी केला मालकी हिस्सा

यावर्षी कोविड-19 महामारीमुळे बारावीची बोर्डाची परीक्षा रद्द झाली होती. याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केली. पर्यायी मूल्यांकन पद्धतीनुसार बारावीचा निकाल तयार केला जात आहे. यावर्षी 19200 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.

हेही वाचाः सीईटी परीक्षेसाठी जीत आरोलकरांकडून विद्यार्थ्यांना ऑफर

इथे पाहू शकता निकाल

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12 वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत बेवसाईटवर gbshse.info येथे भेट द्यावी लागेल. पुढे, होमपेजवरील गोवा बोर्ड क्लास 12 रिझल्ट 2021 लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची प्रमाणपत्रे सादर करुन निकाल तपासता येईल.

हेही वाचाः वास्को अमर नाईक खून प्रकरण: दोन्ही संशयित आरोपींना 7 दिवसांची कोठडी

गोवा बोर्डाने 12 जुलै 2021 रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 23,967 विद्यार्थ्यांपैकी 23,900 विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी 99.98 आहे, तर 99.50 टक्के मुलांनी परीक्षा पास केली आहे. एकूणच 99.74 टक्के विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!