ट्यूशन, जिमखाना, कल्चरल शुल्क 50 टक्के माफ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: चालू शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयीन प्रवेशावेळी सरकारने ट्यूशन, जिमखाना आणि शुल्क ५० टक्के माफ केली आहे. महामारीमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती कठीण बनली आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला असून राज्यातील ३६ महाविद्यालयांमध्ये अंदाजे ४० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | राज्यातील कोविड परिस्थिती ‘जैसे थे’

मुख्यमंत्री म्हणाले…

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ही सवलत लागू होणार आहे. सरकारी व अनुदानित महाविद्यालयांमध्ये याचा लाभ घेता येईल.

हेही वाचाः ‘या’ राज्यात आजपासून विकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू

४० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार

उच्च शिक्षण खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर म्हणाले, बीए, बीएस्सी, बी.कॉम आदी अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे ४० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. अभियांत्रिकी आणि अन्य व्यावसायिक महाविद्यालयांना ही सवलत लागू नाही. ती तांत्रिकी शिक्षण खात्याच्या अखत्यारित येतात.

हा व्हिडिओ पहाः Video | TRIBAL BHAVAN| १३ ऑगस्टला ट्रायबल भवनाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!