किरकोळ घरगुती वादातून तलवारीनं सपासप वार करत जीवघेणा हल्ला

धक्कादायक घटनेत एक जण गंभीर जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : घरगुती वाद कोणत्या कुटुंबात नसतात? घरोघरी मातीच्या चुली ठरलेल्याच. पण म्हापशातील एका कुटुंबात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झालेत. हा सगळा प्रकार घडलाय, सोमवारी संध्याकाळी!

कुठली घटना?

गुड शिवोलीतील श्रीकाळोबा मंदिर परिसरात सिमेपुरुषकर कुटुंब राहतं. या कुटुंबातील अनिता सिनेपुरुषकर या आपल्या घरच्या टॅरेसवर सकाळी गेल्या होत्या. पावसाचं पाणी पिंपात भरत असताना अनिता यांची शेजारील प्रसाद सिमेपुरुषकर कुटुंबीयांनी शाब्दीक चकमक उडाली. ही चकमक एवढी गंभीर होती, की अनिता यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेत याप्रकरणी रितसर तक्रारही दाखल केली होती.

हल्ला करुन पसार

सोमवारी संध्याकाळी अनिता आणि शैलेश सिमेपुरुषकर म्हापसा इथं गाडीनं जायला निघाले. तेव्हा त्यांना अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शैलेश सिमेपुरुषकर यांच्या डोक्यावर आणि शरिरावर तलवारीनं सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात शैलेश हे गंभीररीत्या जखमी झाले. तासभर ते गाडीतच रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला.

अधिक तपास सुरु

त्यानंतर नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं गंभीर जखमी झालेल्या शैलेश यांना रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर आझिलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप असलेले प्रसाद सिमेपुरुषकर, त्यांचा मुलगा विनीत आणि जवळचा नातेवाईक हे तिघेही सध्या फरार आहेत.

हेही वाचा – साडे आठ लाखांची फसवणूक

पोलीस सध्या या तिघांच्या मागावर आहेत. एकूणच या घटनेमुळे गुड शिवोलीतील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करतायत.

हेही वाचा – शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा विभक्त होण्याच्या मार्गावर?

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!