धारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग

गुरुवारी सकाळची घटना; ट्रकचं मोठं नुकसान

मकबूल | प्रतिनिधी

पेडणे: राज्यात अपघातांच्या घटना एकापाठोपाठ एक सुरूच आहेत. मंगळवारी मध्यरात्री केपे येथे एका झेन कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडल्यानंतर धारगळ-पेडण्यात आता असाच एक प्रकार घडलाय. एका ट्रकने पेट घेतल्याची घटना या भागात घडली आहे. सध्या या भागात याच घटनेची चर्चा सुरू आहे.

हेही वाचाः …तर फेक अकाऊंट 24 तासात होणार बंद !

नक्की काय झालंय?

धारगळ – पेडणे येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी एका ट्रकला आग लागल्याचा प्रकार घडल्याने सगळेच घाबरून गेलेत. या आगीत ट्रॅकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ही घटना नक्की कशामुळे घडली, ट्रकने अचानक कसा काय पेट घेतलाय याविषयी माहिती अद्याप कळू शकलेली नाही. मात्र या घटनेनंतर या भागात प्रचंड खळबळ उडालीये.

हेही वाचाः सिंधुदुर्गात ‘डेल्टा प्लस’ रुग्णाच्या परिसरात 6 बिल्डिंग 14 दिवसांसाठी सील !

जिवीतहानी नाही

ट्रकने पेट घेतला तेव्हा यात कुणी नसल्याने थोडक्यात निभावलंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बोललं जातंय. प्राथमिक माहितीनुसार ट्रकच्या इंजिनने अचानक पेट घेतल्याने ही आग लागली असल्याचं अंदाज बोलून दाखवला जातोय. मात्र नक्की कारण काय हे अद्याप उघड होऊ शकलेलं नाही.

हेही वाचाः वसा सावित्रीचा, वटवृक्ष पूजनाचा

ट्रकला आग लागल्यानंतर पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि घाई करत आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!