नो कव्हरेज क्षेत्रात ट्रकला लागली आग, मग काय…

फायर ब्रिगेड पोचण्यास विलंब, ड्रायव्हर-क्लिनरसह पोलिसांचीही तारांबळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मोबाईलमुळं नसता वैताग आलाय, असं आपल्यापैकी अनेकजण म्हणत असतात. पण मोबाईल नसला आणि आपत्ती कोसळली की काय होऊ शकतं, याचा विचारही न केलेला बरा. गोवा आणि कर्नाटकदरम्यान वाहतुकीचा मुख्य मार्ग समजल्या जाणाऱ्या आणि सध्या चर्चेत असलेल्या अनमोड घाटात घडलेल्या घटनेनंतर तर आपण मोबाईलला नक्कीच नावं ठेवणार नाही. संपर्क साधणं कठीण बनल्यानं लाखो रुपयांचं नुकसान होण्याची ही घटना पोलिसांच्या डोळ्यादेखत घडली. काय घडलं नेमकं ते वाचा…

कुठं आणि कशी घडली घटना

गोवा-कर्नाटक सीमेवर अनमोड आरटीओ चेक पोस्टपासून अवघ्या अंतरावर ही घटना घडली. कोकची पावडर घेऊन वास्को शहराच्या दिशेनं निघालेला मल्टी अॅक्सेल ट्रकच्या चालक-वाहकाचीच नव्हे तर पोलिसांचीही या घटनेमुळं तारांबळ उडाली. पोलिसांनी कागदपत्रं तपासण्यासाठी हा ट्रक अडवला असता ड्रायव्हर व क्लिनर दोघेही ट्रकमधून खाली उतरले असता ट्रकनं अचानक पेट घेतला. ट्रकचा हँडब्रेक ओढलेला नसल्यानं तो हळूहळू पुढं सरकू लागला पण तेव्हा वेळ निघून गेली होती. पेटता ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला. ट्रकचा भडका उडाला.

रेंज नसल्यानं प्रॉब्लेम


अनमोड घाट जंगल क्षेत्रात येत असल्यानं तिथं रेंजची वानवा आहे. अशातच ट्रकला आग लागल्यानं सर्वांची तारांबळ उडाली. घटनास्थळापासून नजीकचं अग्निशमन दल खानापूर इथं. मात्र, मोबाईलला रेंज नसल्यानं मदत उशिरा पोचली. घटना कुठं घडलीय आणि नेमकं कुठे जायचं हेच स्पष्ट न झाल्यानं अग्निशमन दलाला उशीर झाला. बंब तब्बल दोन तासांनी घटनास्थळी पोचला. मात्र, तोवर ट्रक आगीत खाक झाला होता. यामुळं लाखोंचं नुकसान झालं. रामनगर पोलिस आऊटपोस्टमध्ये यासंदर्भातील नोंद झाली असून, तपास सुरू आहे.

बोध काय घ्यायचा


एरवी मोबाईलच्या नावानं बोटं मोडणाऱ्यांसाठी ही घटना महत्त्वाची आहे. अशा प्रकारची दुर्घटना घडणारच नाही याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. यामुळं कितीही त्रासदायक वाटत असला प्रवासात मोबाईल जवळ बाळगणं केव्हाही चांगलं.

हेही वाचा

VIDEO | ट्रॅफिक हवालदाराच्या कानशिलात लगावणारी अटकेत, या कारणावरुन झाला राडा

मज्जानी लाईफ! आज्जीबाईंची हौस लय भारी…

फेसबुकवर जपून! शिकारी खुद जहाँ शिकार हो गया… कसं ते वाचा!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!