ACCIDENT | पोरस्कडे येथे ट्रक-कारचा अपघात; सुदैवाने जिवीतहानी नाही

कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर; पेडणे वाहतूक पोलिसांमुळे अपघात झाल्याचा आरोप

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पोरस्कडे येथे रेल्वे पुलाजवळील राष्ट्रीय महामार्गावर पेडणे वाहतूक पोलिस विभागाने दंड आकारण्यासाठी गाड्या अडवल्या. यामुळे याठिकाणी दोन्ही बाजूंनी गाड्यांची रांग लागली होती. याच दरम्यान ओव्हरटेक करणाऱ्या मालवाहू ट्रकने आपल्या विरुद्ध दिशेने तोरसे येथे जाणाऱ्या वेगनार कारला धडक दिल्याने गाडीच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. तसंच कारमधील पती पत्नी जखमी झाले.

हेही वाचाः ACCIDENT | कोरकरणवाडा तलावात बुडून एकाचा मृत्यू

सुदैवाने जिवीतहानी नाही

वारखंड येथील प्रकाश तळवणेकर आणि त्यांची पत्नी प्रशिला तळवणेकर हे दोघेही या अपघातात जखमी झालेत. जी.ए-०३-के-३६३८ क्रमांकाच्या ट्रकने तळवणेकरांच्या जी-ए-०३-सी-११४२ क्रमांकाच्या वेगनार कारला धडक दिल्याने हा अपघात घडला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. 

हेही वाचाः ACCIDENT | धारबांदोड्यात महाराष्ट्र-गोवा वाहन टक्कर; एकजण जखमी

पेडणे वाहतूक पोलिस विभागामुळे अपघात

पेडणे वाहतूक पोलिस विभागाने गाड्यांवर दंद आकारण्यासाठी या मार्गावर मोहीम चालवली होती. यामुळे गाड्यांच्या रांगा लागून वाहतूक झालं होतं. त्यामुळे या अपघाताला पेडणे वाहतूक पोलिस विभाग जबाबदार असल्याचं बोललं जातंय. या अपघातात पेडणे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनाही धडक बसली असती. मात्र वेगनार कारमुळे ते वाचले. पेडणे पोलिसांनी आपघाताचा पंचनामा केला. जखमींना तुयेतील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

पेडणे वाहतूक विभागाकडून वाहन चालाकांची सतावणूक

पेडणे वाहतूक पोलिस विभागाकडून या राष्ट्रीय महामार्गावर गाड्या अडवल्या जाता. ज्यामुळे दोन्ही बाजूंनी ट्रॅफिक होतं. पेडणे वाहतूक पोलिस विभागातर्फे गेल्या काही दिवसांपासून पेडणे तालुक्यात वाहन चालकांची सतावणूक सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या गाड्यांकडून मोठ्या प्रमाणात सध्या हप्ते वसूली करण्याचं काम सुरू आहे. या प्रकाराला पेडण्यातील नागरिक त्रस्त झालेत. गाड्यांची सर्व कागदपत्र तसंच इतर देस्तऐवज असूनही विनाकारण गाड्यांना थांबवलं जातं. अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!