ACCIDENT | धारगळ येथे ट्रक-कारचा अपघात

तिघे जखमी; सुदैवाने जिवीतहानी टळली; कारचं मोठं नुकसान

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे: धारगळ येथील रेडकर हॉस्पिटल जंक्शनजवळ मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात अपघात होऊन कार चालक आणि कारमध्ये असलेली एक महिला तसंच ट्रक चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं.      

हेही वाचाः केरी अमली पदार्थ प्रकरणी संशयितास सशर्त जामीन मंजूर

ट्रक चालक, कार चालक आणि महिला किरकोळ जखमी

एमएच-०९ झेड-००४६ या क्रमांकाची कार धारगळहून कोल्हापूरला जात होती, तर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक (एमएच-०७ सी-५३९७) यांची समोरासमोर टक्कर झाली. यात ट्रक उलटला तर कारची दिशा बदलली. ट्रक चालक किरकोळ जखमी झाला तर कार चालक व एक महिला जखमी झाली. त्यांना म्हापसा येथे उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातात ट्रक उलटून रस्त्यावर काँक्रिट पावडर पसरली तर कारचं मोठं नुकसान झालं. पोलिसांनी अपघातस्थळी  जाऊन पंचनामा केला.

पेडणे राष्ट्रीय महामार्ग धोकादायक स्थितीत

पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम एम व्ही आर कंपनी आपल्याला हवं तसंच करत आहे. या रस्त्यावर सरकारचं दुर्लक्ष झाल्यानं रस्ता ऐन पावसाळ्यात धोकादायक स्थितीत आहे. सध्या रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी मातीचे ढिगारे असल्यानं निसरडेपणा वाढला आहे. रस्त्यावरील खड्ड्याात ठिकठिकाणी पाणी साचलेलं असल्यानं वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक लहान, मोठे अपघात होत आहेत. पत्रादेवी चेक नाका, पत्रादेवी पेट्रोलपंप, पोरस्कडे, मालपे, धारगळ विकास नर्सरी, सुकेकुळण या भागातील रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. शिवाय अनेक ठिकाणी रस्ता खचलेला आहे. सर्व्हिस रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. सरकारने या रस्त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी माजी पंच आवेलीन रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

हेही वाचाः तालिबान्यांकडून म​हिला स्वातंत्र्य नष्ट करण्यास सुरुवात

आतापर्यंत १४ जणांना आपला जीव गमवावा लागला

महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत १४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाम रस्ता मंत्री दीपक पाऊस्कर आणि उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी अधिकारी, नागरिकांच्या उपस्थितीत कंत्राटदाराला दिलेल्या सूचानांची आजपर्यंत कंपनीने पालन केलेले नाही. यामुळे या भागातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | BHAJAN | शिरगांवकर स्मृती विभागीय भजन स्पर्धेचं उद्घाटन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!