मालपेत ट्रकचा अपघात ; सुदैवानं जीवितहानी नाही

खडी घेऊन येत असलेल्या ट्रकने थांबलेल्या ट्रकला दिली जोरदार धडक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : पेडण्यातील मालपे रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी ट्रकचा अपघात झाला. गेल्या २४ तासात राष्ट्रीय महामार्गावर झालेला हा तिसरा अपघात आहे. या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे.
हेही वाचाःघरघर चलो अभियानास पार्सेकरांना भरघोस प्रतिसाद

ट्रकचे ब्रेक न लागल्यानं अपघात

पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु असतानाच हा मार्ग मुत्यूचा सापळा बनत चालला आहे. गुरूवारी रात्री आशेलबाग धारगळ इथं कंटेनरचा भीषण अपघात झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी तार म्हापसा इथे कारचा अपघात झाला. त्यातच शुक्रवारी मालपेत दोन ट्रकची टक्कर होऊन अपघात झाला. शुक्रवारी संध्याकाळी पेडण्यातील मालपे रेल्वेस्थानकाजवळ एका मालवाहू ट्रकला दुसऱ्या एका ट्रकने येऊन धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या या ट्रकचे ब्रेक न लागल्यानं ट्रक दुसऱ्या ट्रकवर जाऊन आदळला. ही धडक एवढी जोरात होती की त्यात ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवानं यात जिवीतहानी झाली नाही.
हेही वाचाःविकासकामांमुळे मी निवडून येईन

सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही

मालपे पेडणे येथे सायंकाळी पेडणेमार्गे प्रवासी बस म्हापसा येथे जात होती. ही बस मालपै येथील रेल्वे स्थानकाच्या जवळ स्टॉप घेण्यासाठी थांबली असता त्यांच्यामागे मालवाहू ट्रक बसमागे थांबला होता. यावेळी पाठीमागून खडी घेऊन येत असलेल्या ट्रकने थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, त्यात ट्रकच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. सुदैवाने या ट्रकच्या चालकाला कुठलीही इजा न होता वाचला. अपघात झाल्यानंतर ट्रकचे इंजीन फुटून ऑईल गळती झाली. यावेळी पेडणे अग्निशमन दलाने या रस्त्यावर माती टाकून प्रसंगावधान राखले व संभाव्य अपघात टाळले. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.
हेही वाचाःअपघातातील मृत चालकाची ओळख पटली

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!