शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

Goan Varta Live | प्रतिनिधी
वास्कोः शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वास्कोत रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. याप्रसंगी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून महाराजांचा जयजयकार करण्यात आला.
हेही वाचाः छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे
शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन
येथील हुतात्मा चौकापासून काही अंतरावर हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या सोहळ्याला माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, नगरसेवक दीपक नाईक, नगरसेवक नारायण बोरकर, नगरसेवक विनोद किनळेकर, नगरसेविका देविता आरोलकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप नार्वेकर, अखिल गोवा क्षत्रिय मराठा समाजाच्या मुरगाव विभागाचे अध्यक्ष नारायण नाईक, गोवा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण नाईक, गीता शिरोडकर, नीलेश पाटील, चंद्रकांत शिरुर, गौरिष नाईक, राहूल शिंदे, अविनाश रेडकर तसंच इतर शिवप्रेमी उपस्थित होते.
हेही वाचाःं केरी संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणार; 1000 सुरुची झाडं लावणार
आजच्या दिवशी महाराजांना ‘शिवछत्रपती’ होण्याचा सन्मान प्राप्त झाला
6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. त्या दिवशी शिवरायांना ‘शिवछत्रपती’ होण्याचा सन्मान प्राप्त झाला आणि पुढे महाराजांना पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारलं गेलं. बुद्धी, शौर्य, धडाडी, निष्ठा आणि धैर्य या जोरावर महाराजांनी शत्रूंना पराभूत करून भारतभूमीवर आपली पकड मजबूत केली. या कार्यात महाराजांना मावळ्यांची अखंड साथ आणि जनतेचे अमुल्य प्रेम मिळालं. आजही महाराजांचे स्थान प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अबाधित आहे. याची परिणीती म्हणून आजही राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, असं माजी सभापती राजेंद्र आर्लेकर म्हणाले.