मुरगाव पोलिस स्थानक परिसरात वृक्षारोपण

नगराध्यक्ष दामोदर कासकर यांचा उपक्रम

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुरगाव पोलिस स्थानक परिसरात मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, पोलिस निरीक्षक परेश नाईक आणि इतरांनी मिळून वृक्षारोपण केलं.

हेही वाचाः शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

भाजप मुरगाव मंडळाकडून वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप मुरगाव मंडळाने शनिवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी भाजपा मुरगाव मंडळ अध्यक्ष संजय सातार्डेकर, नगरसेवक मंजुषा पिळणकर, प्रजय मयेकर, भाजपा मुरगाव युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बांदेकर, प्रसाद सातार्डेकर तसंच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचाः छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे

वृक्षाचं जतन करण्याची गरज

फक्त वृक्षारोपण केलं म्हणजे झालं नाही, तर त्या वृक्षांचं जतन करण्याची नितांत गरज आहे. आपल्या परिसरात वृक्षसंपदा वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असं आवाहन कासकर यांनी केलं. निरीक्षक नाईक यांनी निसर्ग रक्षणासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचं स्पष्ट केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!