थोडक्यात अनर्थ टळला! झाडाची फांदी पडून कारचं मोठं नुकसान

सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही!

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : वास्कोतील लापाझ हॉटेलासमोरच्या पालिका गार्डनमधील एका मोठया झाडाची फांदी तुटली. यावेळी झाडाजवळ असलेल्या तीन कारवर ही फांदी पडली. यामध्ये तिन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यातील एका कारचा तर चक्काचूर झालाय. फांदी तुटून खाली पडताना वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजवाहिन्या तुटून वीजप्रवाहही काही काळ खंडीत झाला होता.

का तुटली फांदी?

पालिका गार्डनच्या बाहेरील पदपथावरून लोकांची ये-जा चालू असते. फांदी जेव्हा तुटली तेव्हा सुदैवानं त्या ठिकाणी कुणीही नव्हतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पालिका गार्डनाच्या कडेला मोठी झाडे आहेत. त्यापैकी काही झाडे बरयाच वर्षाची असल्याने त्यांच्या फांद्या तुटण्याच्या घटना घडत असतात. गार्डनमधील एका झाडाची मोठी फांदी यापूर्वी तुटली होती. त्यामुळे त्या झाडाच्या दुसऱ्या बाजूच्या फांदीवर ताण आला होता.

त्या ताणाने झाडाची फांदी तुटली. या गार्डनच्या बाहेर रस्त्यावर कार पार्किंग आहे. तिथे काही कार उभ्या करण्यात आल्या होत्या. ती फांदी तेथे उभ्या करण्यात आलेल्या तीन कारवर पडली. त्या तीनपैकी एका कारवर फांदीचा मोठा भाग पडल्याने त्या कारची पूर्णपणे मोडतोड झाली. इतर कारचंही थोड्याफार प्रमाणात नुकसान झालंय. वीजतारा तुटल्याने वीजप्रवाह खंडित झाला.

महत्त्वाचे मुद्दे

  • झाड पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं.
  • त्यांनी झाडाची फांदी कापून हटविण्याचे काम हाती घेतले.
  • त्यानंतर वीज खात्याच्या कामगारांनी वीजतारा दुरुस्तीचे काम हाती घेऊन वीजप्रवाह पुर्ववत केला.
  • सदर घटनेमुळे लापाझ हॉटेललगतच्या अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!