जिथे भरपूर रहदारी असते, अशा पणजीच्या रस्त्यावर भलंमोठं आंब्याचं झाड कोसळलं!

झाड कोसळून गाड्यांचं नुकसान, पण सुदैवानं मोठा अनर्थ टळला!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मुसळधार पावसाचा फटका पणजी शहाराला बसल्याचं सोमवारी पाहायला मिळालंय. सोमवारी पणजीतील भाजप कार्यालय आणि ICICI बँकेच्या जवळ एक भलंमोठं आंब्याचं झाड कोसळलं. हे झाड थेट पार्क केलेल्या गाड्यांवर आदळलं. यावेळी गाडीत कुणीही नव्हतं म्हणून मोठा अनर्थ टळलाय.

मुळसकट लाद्या उखडून हे झाड रस्त्याच्या मधोमध आडवं झालं. पार्क केलेल्या जागेत असलेल्या गाड्यांचंही यामध्ये नुकसान झालंय. ज्या ठिकाणी हे झाड कोसळलं ते ठिकाणी पणजीतील रहदारीच्या ठिकाणांपैकी एक आहे. या मार्गावरुन वाहनांची माणसांची रदहारी सुरुच आहेत. मात्र सुदैवानं जेव्हा हे झाड कोसळलं, तेव्हा या मार्गावर कुणीही नव्हतं. अन्यथा मोठा अनर्थ घडला असला. काही प्रमाणात गाड्यांचं नुकसान सोडलं, तर कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याचं अजूनतरी समोर आलेलं नाही.

दरम्यान, झाड पडल्याची माहिती मिळताच, तत्काळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच हे झाड हटवण्यासाठी मदतकार्य सुरु केलंय. काही दिवसांपूर्वी पणजीतील एका जुन्या इमारतीचा भागही कोसळला होता. मुसळधार पावसामुळे राज्याला पूर्णपणे झोडपून काढलंय. अशातच रविवारी झालेल्या धुव्वाधाव पावसानंतर आता सोमवारीही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सकाळपासून पणजीसह राज्यात सर्वदूर पावसाची बॅटिंग सुरु आहे.

पाहा फोटो

पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!