TRANSFER | राज्यातील अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः राज्य सरकारने बुधवारी मामलेदार, संयुक्त मामलेदार, सहायक संचालक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पेडणे पालिकेच्या मुख्याधिकारीपदी संदीप गावडे यांची बदली करण्यात आली आहे. कार्मिक खात्याचे अवर सचिव विशाल कुंडईकर यांच्या सहीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.
बदली झालेले अन्य अधिकारी व कंसात बदलीचे पद
राजाराम परब (संयुक्त मामलेदार ३, बार्देश), प्रिया सामंत (संयुक्त मामलेदार २, पेडणे), शैलेंद्र देसाई (संयुक्त मामलेदार ४, बार्देश), कृष्णा गावस (संयुक्त मामलेदार ४, तिसवाडी), आवेलीना डिसा ई परेरा (संयुक्त मामलेदार २, मुरगाव), रघुराज फळदेसाई (संयुक्त मामलेदार ३, सासष्टी), प्रतापराव गावकर (मामलेदार सासष्टी), विनोद दलाल (मामलेदार काणकोण), भिकू गावस (मामलेदार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय), कौशिक देसाई (मामलेदार, धारबांदोडा), साईश नाईक (संयुक्त मामलेदार १, फोंडा), अनिल राणे (संयुक्त मामलेदार २, बार्देश), जेनिफर फर्नांडिस ई आग्रेज (संयुक्त मामलेदार २, तिसवाडी), रोझारीयो कार्वाल्हो (संयुक्त मामलेदार ६, सासष्टी), गौरव गावकर (मामलेदार, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय), देवोना इल्सा पेरेरा (संयुक्त मामलेदार १, सासष्टी)