उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपदावर शोबित सक्सेना यांची बदली

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी
पणजी: पोलीस अधीक्षक (आयपीएस) शोबित सक्सेना यांची उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपदावर बदली करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे गुन्हा शाखेच्या अधीक्षक पदाचा अतिरिक्त ताबा दिला आहे. याबाबतचा आदेश कार्मिक खात्याचे अवर सचिव विशाल कुंडईकर यांनी जारी केला आहे.
हेही वाचाः म्हादई अभयारण्य अधिकाऱ्याकडून सरकराकडे पोलीस संरक्षणाची मागणी
उत्क्रृष्ट प्रसून्न यांची ‘आयबी’ सहाय्यक संचालकपदी नियुक्ती
भारतीय पोलीस सेवेच्या एग्म्यू कॅडरचे 2014 बॅचचे पोलीस अधीक्षक उत्क्रृष्ट प्रसून्न (आयपीएस) यांच्याकडे उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपदाचा ताबा होता. त्यांची चार वर्षांसाठी केंद्रीय गुप्तचार विभागात (आयबी) सहाय्यक संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना 31 मे रोजी गोवा पोलीस सेवेतून मुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपद रिकामी झालं होतं. या पदावर भारतीय पोलीस सेवेच्या एग्म्यू कॅडरचे 2015 बॅचचे अधिकारी शोबित सक्सेना यांची बदली करण्यात आली आहे.
हेही वाचाः कोविड-19 चाचण्या घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा
18 जुलै 2019 रोजी गोव्यात झाली होती बदली
केंद्रीय गृह मंत्रालयाने अधीक्षक सक्सेना यांची गोव्यात 18 जुलै 2019 रोजी बदली केली होती. त्यानंतर त्यांना विशेष विभागाचे आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचा अधीक्षक पदाचा ताबा देण्यात आला होता. त्यानंतर अधीक्षक सक्सेना यांची गुन्हा शाखेच्या पोलीस अधीक्षक पदाचा ताबा देण्यात आला होता.