उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 न्यायाधीशांची बदली

मंगळवारी दिले बदलीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक जनरल एस. सी. डिगे यांनी जारी केले आदेश

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी:  मुंबई उच्च न्यायालयाने तीन वेगवेगळे आदेश जारी करून राज्यातील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशासह इतर प्रथमवर्ग न्यायाधीश मिळून 21 न्यायाधीशांची बदली केली आहे. या बाबतचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक जनरल एस. सी. डिगे यांनी मंगळवारी जारी केले आहे.

हेही वाचाः भारतात अँटीबॉडी कॉकटेलने करोनावर पहिल्यांदाच यशस्वी उपचार, रुग्णाला डिस्चार्ज

पहिल्या आदेशात 8 न्यायाधीशांची बदली

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पणजी येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांची बदली मडगाव येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून केली आहे. तर त्या पदावर असलेले प्रधान न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांची बदली पणजी येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावर केली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश शेरीन पॅवल यांची बदली म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून केली आहे. तर त्याच्या जागी जिल्हा न्यायाधीश एडगर फर्नांडीस यांची बदली केली आहे. म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांची बदली फोंडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात केली आहे. तर त्या जागी असलेले न्यायाधीश बेला नाईक यांची बदली पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात केली आहे. औद्दोगिक व कामगार लवादाचे अध्यक्ष व न्यायाधीश विन्सेंट डिसिल्वा यांची बदली मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात केली आहे. तर म्हापसा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांची बदली मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात केली आहे.

हेही वाचाः तरुण तेजपालच्या विरोधात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी

दुसऱ्या आदेशात 7 न्यायाधीशांची बदली

दुसऱ्या आदेशात मडगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी राम प्रभूदेसाई यांची बदली पणजी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी पदावर केली आहे. तर त्याच्या जागी न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांची बदली केली आहे. मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायाधीश साई प्रभूदेसाई यांची फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात बदली केली आहे. तर त्या जागी असलेले न्या. अनिल स्कारीया यांची बदली पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात केली आहे. न्या. आर. फर्नांडिस यांना त्याच्या मूळ जागी मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात पाठविण्यात आले आहे. तसेच न्या. शुभदा दळवी यांना त्याच्या मूळ जागी वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयात पाठविण्यात आले आहे. पणजी येथील मूख्य न्यायदंडाधिकारी आरतीकुमारी नाईक यांना पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाचा ताबा देण्यात आला आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, कोरोनाबळींची संख्येत मात्र घट

तिसऱ्या आदेशात 8 जणांची बदली

या व्यतिरिक्त तिसरा आदेशात म्हापसा य़ेथील प्रथमवर्ग न्या.शांताश्री शिनाई कुडचडकर याची मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात बदली केली आहे. तर त्याच्या जागी न्या. निलिमा काणकोणकर यांची बदली केली आहे. न्या. अक्षता काळे याची बदली डिचोली येथील    प्रथमवर्ग न्यायालयात केली आहे. न्या. गिरीजा गावकर यांची बदली केपे येथील प्रथमवर्ग न्यायालयात बदली केली आहे. न्या. ज्यूड सिक्वेरा यांची बदली वाळपई येथील प्रथमवर्ग न्यायालयात केली आहे. न्या. मनिषा शैलेश नार्वेकर यांची बदली मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात केली आहे. न्या. सबिना ब्रागांझा यांची बदली पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात केली आहे. तर न्या. सुमन गाड यांची बदली पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात बदली केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!