पोलीस खात्यातील ११ पोलीस उपनिरीक्षकांची बदली

पोलिस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार मुख्यालयाचे अधीक्षक अभिषेक धानिया यांनी जारी केला आदेश

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: पोलीस खात्यातील ११ पोलीस उपनिरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पोलिस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार मुख्यालयाचे अधीक्षक अभिषेक धानिया यांनी मंगळवारी जारी केला आहे.

हेही वाचाः हरीष गावस यांनी घेतला वाळपई पोलिस स्थानकाच्या ‘पीआय’ पदाचा ताबा

कुठे कुणाची बदली?

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, कुळे पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गावकर यांची बदली फोंडा पोलीस स्थानकात केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुभाष गावकर यांची बदली कोलवा पोलीस स्थानकात केली आहे. त्याजागी असलेले पोलीस उपनिरीक्षक राहूल नाईक याची बदली कुंकळ्ळी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

पणजी पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक गिरेंद्र नाईक यांची बदली मडगाव पोलीस स्थानकात केली आहे. त्याजागी असलेलेल पोलीस उपनिरीक्षक स्टेनली गोम्स याची बदली पणजी पोलीस नियंत्रण कक्षात केली आहे.

हेही वाचाः मांद्रे मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत

मायणा – कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भगत यांची बदली मडगाव पोलीस स्थानकात केली आहे. पणजी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक साहिल वारंग यांची बदली हणजुण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. त्या जागी असलेले पोलीस उपनिरीक्षक महेश केरकर यांची बदली पणजी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

हेही वाचाः MISSING | आपण याला पाहिलंत का? बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचं आवाहन

कोलवा पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक अरूण आलेक्स एन्ड्र्यू याची बदली मायणा –कुडतरी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. त्या ठिकाणी असलेले महिला पोलीस उपनिरीक्षक मंदा कुंडईकर याची बदली मडगाव विशेष विभागात, तर त्याजागी असलेले पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप याची बदली मायणा – कुडतरी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

हा व्हिडिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!