पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांना प्रशिक्षण…

आरजीपीकडून निषेध : पावसाळी अधिवेशन ११ जुलैपासून सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन ११ जुलैपासून सुरू होत असून तत्पूर्वी विधानसभेतील नव्या सदस्यांना प्रशिक्षण देण्याची योजना २७-२८ जून या तारखेला आखण्यात आली होती. मात्र, रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) नेते मनोज परब यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रशिक्षणाचा निषेध केला आहे.
हेही वाचा:जमीन हडप प्रकरणातल्या संशयिताला सशर्त जामीन… ‍

१९ नवे चेहेरे विधानसभेत पोहोचले

हे प्रशिक्षण विधानसभा आवारात घेण्याऐवजी पंचतारांकीत हॉटेलमध्ये घेण्यात आले. सरकारकडे सध्या सरकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात अपयशी ठरले आहे. राज्य सरकारवर कर्जाचा मोठा बोजा आहे. असे असताना पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे, अशी टीकाही परब यांनी यावेळी केली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत १९ नवे चेहेरे विधानसभेत पोहोचले आहेत. यात आरजीपीचे सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांचाही समावेश आहे. तेही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. त्यांनीदेखील या प्रशिक्षण कार्यक्रमाचा निषेध केला आहे.
हेही वाचा:बनावट विक्री कागदपत्रे करून फसवलं बँकेला… ‍

आपली विचारधारा अन्य पक्षांवर थोपवू नये

ज्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, ते हॉटेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याचे आहे. सरकारने अशा हॉटेलमध्ये प्रशिक्षण आयोजित करून आपली विचारधारा अन्य पक्षांवर थोपवू नये, असे आमदार बोरकर यावेळी म्हणाले. आमदारांना प्रशिक्षणच जर द्यायचे असेल तर जे माजी मंत्री, जाणकार अधिकारी यांची समिती स्थापन करावी. त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा:उच्च न्यायालयाचा सरकारला झटका! ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!