वास्को ते यशवंतपूर आजपासून धावणार खास प्रवासी रेल्वे

लॉकडाऊननंतर प्रथमच: मार्गावर विविध थांबे असणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को- वास्को ते यशवंतपूर मार्गावरील बंद झालेली प्रवासी रेल्वे सेवा आज पासून पुन्हा सुरू होणारे. मंगळवारी रात्री 9:20 वाजता वास्को रेल्वे स्थानकावरून ही खास रेल्वे यशवंतपूर (बेंगळुरू) येथे जाण्यासाठी रवाना होणारे, बुधवारी दुपारी 12:30 वाजता तेथे पोहोचणारे. बुधवारी (दि.18) दुपारी 2;30 वाजता यशवंतपूर येथून वास्कोला येण्यासाठी ही प्रवासी रेल्वे निघणार असून, गुरुवारी पहाटे 6:00 वा. वाजता ती येथे पोहोचणारे. या खास मार्गावर सुरू करण्यात येणारी रेल्वे दररोज प्रवाशांना घेऊन निघणार असल्याची माहीती दक्षिण पच्शिम रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त झालीये.
या प्रवासी रेल्वेला २१ डबे (कोच) असणार असून यापैकी एक २ टायर दोन एसी ३ टायर कोच, अकरा स्लीपर क्लास कोच, पाच सेकण्ड क्लास कोच व दोन सेकंण्ड क्लास लगेज कोच आहे. लॉकडाऊन नंतर प्रथमचं या मार्गावर मंगळवारी वास्को रेल्वे स्थानकावरून 07340 रात्री 9;20 वाजता यशवंतपुर जाण्यासाठी रवाना होणारे. बुधवारी दुपारी २.३० वाजता खास प्रवासी रेल्वे (ट्रेन क्र. 07339) वास्कोला येण्यासाठी तेथुन रवाना होणारे. ही खास प्रवासी रेल्वे मडगाव, सावर्डे, कुडचडे, कुळे,केसलरोक, लॉडा, अल्णावर, धारवाड, हुबळी हावेरी, राणीबेन्नर, हरिहर, दावणगिरी, बिरुर, अरसिकेरे, तिपतुरू आणि तुमकुरू येथे थांबणारे.

हेही वाचा

विराटच्या अनुपस्थितीत रोहितला कसोटीत स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी !

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!