शुक्रवारी राजधानीत दोन्ही मांडवी पुलांवर दोन तास ट्रॅफिक जॅम

स्वातंत्र्यदिनानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट जुन्या सचिवालय परिसर वाहतूकीसाठी बंद; माहिती आणि प्रसिद्धी खात्याकडून पूर्व कल्पना देण्यात उशीर झाल्याने झाली वाहतूक कोंडी

नारायण पिसुर्लेकर | प्रतिनिधी

पणजी:  दरवर्षी १५ आगस्ट रोजी जुन्या सचिवालात स्वातंत्र दिन साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी दोन दिवस अगोदर जुन्या सचिवालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येत आहे. मात्र यंदा अचानक रस्ता वाहतूक बदद्ल बाबतची माहिती प्रसिद्धी खात्यामार्फत करण्यात आली नसल्यामुळे पणजी शहरासह दोन्ही मांडवी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहनाची रांगा लागली होती. त्यामुळे पणजी शहरात दोन तास चक्काजाम झाले होते.

१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट जुन्या सचिवालय परिसर वाहतूकीसाठी बंद

स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट कार्यक्रम संपेपर्यंत नेहमीप्रमाणे जुन्या सचिवालय परिसर वाहतूकीसाठी बंद करण्यात येत आहे. तसंच सुरक्षेच्या कारण्याने बंद करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांना पुर्व कल्पना देण्याची आवश्यकता होती. असे असतांना वाहतूक विभागाने किंवा प्रशासनाने याबाबत प्रसिद्ध प्रत्रक जारी करून याची माहिती देणं गरजेचं होतं. शुक्रवारी अचानक तालीम घेण्यासाठी सकाळी आठ ते दहा वाजता जुन्या सचिवालय परिसर बंद करण्यात आलं तसंच या वेळी कामानिमित्त पणजी शहरात येणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्रास सोसावा लागला. याचा पडसाद सोशल मिडियावर दिसून आला. याबाबत नागरिकांना सोशल मिडियावर मोठ्या वाहतूक विभागावर टिका करून राग व्यक्त केला.

अचानक वाहतूक मार्ग बदलल्याने ट्रॅफिक जॅम

दरम्यान याबाबत सबंधित वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं असता, सबंधित कार्यक्रमबाबत रात्री उशीरा बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सकाळी स्वातंत्र दिन कार्यक्रमाची तालीम घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे अचानक झालेल्या वाहतूक बदलीमुळे नागरिकांना अर्ध्यातास रांगेत राहावं लागलं. तर इतर दिड तास वाहतूक धिम्यागतीने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी वाहतूकीबद्दल प्रसिद्धीपत्रक जारी करून नागरिकांना माहिती देण्यात आली आहे.    

हा व्हिडिओ पहाः PWD Minister Live | गोव्यातील नळांचं पाणी खरोखरचं दूषित आहे का?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!