अनमोडमध्ये दरड कोसळून तर चोर्ला घाटात झाड पडून वाहतुकीचा खोळंबा, ट्रॅफिक जॅम

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : धुव्वाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे राज्यातील रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. कर्नाटकच्या दिशेने जाणारे आणि जोडणारे महत्त्वाचे दोन मार्ग मुसळधार पावसानं प्रभावित झालेत. चोर्ला घाट आणि अनमोड या दोन्ही ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाल्याचं वृत्त समोर येतेय. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न आता सुरु आहेत.

Video | महापुराचा वेढा, पहिल्या मजल्यापर्यंत चिपळुणात पुराचं पाणी

खोळंबा

चोर्ला घाटात झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे कर्नाटक आणि गोव्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या अनमोडमध्येही दरड कोसळून वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय.

कोकण रेल्वे ठप्प ; सिंधुदुर्गात अडकलेल्या गाड्या परत मडगावला

काळजी घ्या

राज्यात मुसळधार पावसानं हाहाकार उडवलाय. सत्तरी आणि डिचोलीत पूरस्थिती आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी रस्ता वाहून जाण्याच्या किंवा खचण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे एकूणच रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडालाय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रस्ते मार्गाने जाणाऱ्यांनाही खबरदारी बाळण्याचं आवाहन करण्यात येतंय. तर दुसरीकडे पाण्यातून गाड्या न घालण्याचाही सल्ला दिला जातो आहे. काल वाळपईमध्ये एक रिक्षा पाण्यात अडकली होती. फायर ब्रिगेडच्या मदतीनं नंतर या रिक्षाला बाहेर काढण्यात यश आलं.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!