डिचोलीत काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली पोलिसांनी अडवल्यानं वाद

पोलिस, संयुक्त मामलेदारांनी रोखले

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं डिचोलीत ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र परवानगी नसल्यानं रॅली काढता येणार नाही, असा आक्रमक पवित्रा पोलिसांनी घेतल्याने सुमारे दोन तास शाब्दिक युद्ध रंगलं. अखेरीस दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेतल्यानं रॅलीचा मार्ग मोकळा झाला.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास डिचोलीतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ काँग्रेस कार्यकर्ते जमू लागले. शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी रॅली आयोजित केली होती. त्यासाठी तीन ट्रॅक्टर आणले होते. मात्र या रॅलीला परवानगी नसल्याचं कारण देत पोलिसांनी तसेच संयुक्त मामलेदार श्रीपाद माजिक यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवून धरलं. यावेळी मोठी बाचाबाची झाली. अखेर दोन तासांच्या चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी गर्दी न करता पुरेसं अंतर ठेवून जाण्यास तयारी दर्शवली आणि रॅलीला परवानगी देण्यात आली.

या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, संकल्प आमोणकर, मेघश्याम राऊत, वरद म्हार्दोळकर, प्रवीण ब्लेगन, अभिजित देसाई, मनोज नाईक, विजय भिके, अमरनाथ पणजीकर, दिलीप धारगळकर, दशरथ मांद्रेकर, मंगलदास नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!