म्हापशात ३ वाहनांचा विचित्र अपघात, तरुणीच्या डोक्यावरुन गेलं टेम्पोचं चाक, जागीच मृत्यू

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसा : राज्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेतलं नाहीये. राज्यात पर्यटनासाठी आलेली हरियाणातील तरुणी गोव्यातील रस्ते अपघाताचा बळी ठरली आहे. 22 वर्षीय तरुणीचा म्हापशातील विचित्र अपघातात दुर्देवी अंत झालाय. गोवा फिरण्यासाठी आलेल्या हरियाणाच्या तरुणीवर काळानं घाला घातलाय. दुचाकीवरुन फिरताना झालेल्या विचित्र अपघातात ही तरुणी रस्त्यावर पडली. टेम्पोचं चाक या तरुणीच्या डोक्यावरुन गेलं आणि या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय.

कुठे झाला अपघात?
धुळेर येथील काउंटो शोरुमसमोरील रस्त्यावर झालेल्या तीन वाहनांचा शनिवारी विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये रिया गुप्ता या 22 वर्षांच्या हरियाणातील तरुणीचा मृत्यू झालाय. हरियाणातील ही तरुणी गोव्यात पर्यटनासाठी आली होती. एका वर्तमान पत्राच्या टेम्पोचे चाक अंगावरून गेल्याने तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि रिया गुप्ताचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री १०.३०च्या सुमारास घडल्याची माहिती मिळतेय.
हेही वाचा : VIDEO | पादचाऱ्याचा निष्काळजीपणा नडला; भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने उडवलं

कसा झाला अपघात?
दोन दुचाकी म्हापशाहून धुळेर मार्गे करासवाड्याच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी रस्त्यावर एक साप आल्याने दोन्ही दुचाक्या एकमेकांना आदळल्या. यात दोन्ही दुचाकीचं हँडल आपटल्याने एका दुचाकीवरील तरूण तरूणी खाली पडली. त्याचवेळी म्हापशामार्गे पर्वरीच्या दिशेने जाणार्या टेम्पो चालकाने युवतीला वाचविण्यासाठी गाडी रस्त्याकडेला वळविण्याचा प्रयत्न केला. पण वाहनाचं चाक युवतीच्या अंगावरून गेल्यानं तिच्या मेंदूलाच मार लागला. या मार इतका जबरदस्त होता की तरुणीच्या डोक्याचा चेंदामेंदा झालाय. तिचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा : VIDEO | अंगावर काटा आणणारा अपघात! गोंयकार कुटुंबाला एक्स्प्रेस वेवर कंटेनरने चिरडलं
तसेच टेम्पोचं दुसरे चाक गटारात गेल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्यावरच पलटी झाले. या अपघातात दुचाकीवरील युवतीचा मित्र करण सबरवाल हा किरकोळ जखमी झाला. तर टेम्पो चालकही किरकोळ जखमी झाला. दरम्यान, या अपघाताचा पोलिस आता अधिक तपास करत आहेत.
हेल्मेटचं महत्त्व

दरम्यान, या अपघातानं दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांनीही हेल्मेट घालणं किती महत्त्वाचंय याची जाणीव पुन्हा एकदा करुन दिली आहे. दुचाकीस्वारानं तर हेल्मेट घातलंच पाहिजे. पण मागे बसणाऱ्या व्यक्तीकडेही हेल्मेट असं नितांत गरजेचं आहे. कोणत्या वेळी कधी कोणता प्रसंगाला सामोरं जावं लागेल, हे कुणीच सांगू शकत नाही. अशावेळी खबरदारी बाळगणं हे नितांत आवश्यक आहे. त्यामुळे दुचाकीवरुन जाताना प्रत्येकानं हेल्मेटचा वापर करायलाच हवा.
हेही वाचा : ACCIDENT | सावईवेरेत शॉक लागून तिघांचा मृत्यू

हेही वाचा : काळापेक्षाही क्रूर बनला कोरोना ; एकाच दिवशी कुटुंबातल्या तिघांचा बळी!