पर्यटक कारचालक दारुच्या नशेत, कुळेतील अपघातात ४ पर्यटक जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मोले : कोविडमुळे गोव्यात पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालीय. मात्र जे थोडे पर्यटक आहेत त्यांचा कोविडमध्येही जिवाचा गोवा सुरु आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. मोलेत रविवारी पर्यटकांच्या कारला अपघात झाला. या घटनेची सर्वात गंभीर बाब म्हणजे या कराचा पर्यटक ड्रायव्हर हा दारुच्या नशेत होता अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार अपघात झालेल्या रेंट अ कारमधील ४ जखमी पर्यटकांना नजीकच्या धारबांदोडा प्राथमीक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आलाय. स्थानीकांनी जखमींना कारमधून बाहेर काढल्यान आणि घटनास्थळी तात्काळ १०८ रुग्णवाहीका पोचली. जखमी पर्यटकांना वेळत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.

राज्यात उपद्रवी पर्यटकांचा धिंगाणा

संपूर्ण देशात आणि गोव्यातही कोविडची स्थिती गंभीर असताना अनेक पर्यटकांकडून दारु पिऊन धिंगाणा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी पणजी म्युनिसिपल गार्डनच्या बाहेर दारुच्या नशेत गोधळ घाणाऱ्या पर्यटकांची दृश्य गोवन वार्ता लाईव्हने टिपली होती. आता स्थानिकांच्या दाव्याप्रमाणे मोलेतील अपघातग्रस्त पर्यटक कारचा चालक हा दारुच्या नशेत होता. त्यामुळे या बेफान पर्यटकांना कोण आवरणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!