गोव्यापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर झिपलाईनचा थरार!

देवगडमध्ये झिपलाईन प्रोजेक्टचा शानदार शुभारंभ

Goan Varta Live | प्रतिनिधी

देवगड : देशातील सर्वाधिक लांबीची आणि महाराष्ट्रातील पहिल्या देवगड झिपलाईन प्रोजेक्टचा शानदार शुभारंभ करण्यात आला. शनिवारी 26 डिसेंबरला या प्रकल्पाचं शानदार लोकार्पण करण्यात आलं. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दिमाखात या प्रोजेक्टच लोकार्पण करण्यात आलंय. यावेळी माजी आमदार अँड. अजित गोगटे यांनी झिपलाईनचा थरार अनुभवला.

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून, देवगड जामसंडे नगरपंचायत आणि फ्लाईंग कोकण क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड पवनचक्की येथील समुद्रकिनारी साकारत असलेला महत्वकांक्षी प्रोजेक्टचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, सभापती सुनील पारकर, जिल्हा चिटणीस बाळा खडपे, प्रकाश राणे, श्रीकांत जोईल, वैष्णवी जोईल, नगरसेवक उमेश कणेरकर, योगेश चांदोसकर, संदीप साटम, डॉ. अमोल तेली, पोलीस उपनिरीक्षक संजय कातीवले, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, रवी पाळेकर, सुभाष धुरी आदी उपस्थित होते.

झिपलाईनची खासियत काय?

देशातील सर्वाधिक लांबीचा आणि महाराष्ट्रातील पहिला असा हा साहसी क्रीडा प्रकार देवगडात होतोय. १८८५ फुट लांब आणि २८० फूट उंच अशी हि झिपलाईन आहे. त्यामुळे देवगडच्या आणि सिंधुदुर्गाच्या पर्यटनात यामुळे अधिकच भर पडणार आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही यामाध्यामातन होणार आहे. सिंधुदुर्गातल्या साहसी पर्यटन करणाऱ्यांसाठी हि मोठी पर्वणीच ठरणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!