मीरामार किनाऱ्यावर पर्यटकांची धुळवड! जमावबंदीचं काय झालं? नेटकऱ्यांचा सवाल, फोटो Viral

दक्षिण आणि उत्तर गोव्यात जमावबंदीचा फज्जा?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्टीमुळे गोव्यात अनेक पर्यटक दाखल झाले. त्याचप्रमाणे राज्यात दाखल झालेल्या पर्यटकांनी धुळवडही मोठ्या उत्साहात साजरी केली. मीरमार किनाऱ्यावरील पर्यटकांचे रंग खेळतानाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंनी राज्यात लागू करण्यात आलेल्या १४४ कलमावरच सवाल उपस्थित केले आहेत.

हेही वाचा – शिवजयंतीदिनी कळंगुटपर्यंत मिरवणूक नेणारच

जमावबंदीचा फज्जा?

मीरामार किनाऱ्यावर मोठ्या उत्साहत पर्यटकांनी होळी साजरी केली. रंग खेळतानाचे क्षणही कॅमेऱ्यात कैद झालेत. या सगळ्यात जमावबंदीचा पुरता फज्जा उडाल्याची टीका करण्यात येते आहे. ANIने मीरामार किनाऱ्यावर पर्यटकांनी साजऱ्या केलेल्या होळीचे फोटो समोर आणले आहेत. या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. शिमगोत्सव वाढत्या कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. त्याचप्रमाणे होळीला होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेपाठोपाठ उत्तर गोव्यातही कलम १४४ लागू करण्यात आलं. मात्र लागू करण्यात आलेल्या जमावबंदीचा पुरता फज्जा उडाल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा – सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची होणार तपासणी?

सोशल मीडियावर टीका

एकीकडे पर्यटकांकडून जमावबंदीचा फज्जा उडवला जात असताना कलम १४४चं काय झालं, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दुसरीकडे संपूर्ण राज्यात सातत्यानं कोरोना रुग्णवाढीचा वेग चिंतेचा विषय ठरतोय. अशावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागली आहे. मात्र नियमांचं पालन किती केलं जातंय, असाही प्रश्न विचारला जातोय. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. मात्र कमीअधिक प्रमाणात सगळीकडे होळी साजरी करण्याचा उत्साह नेहमीसारखाच असल्याचं चित्र पाहायला मिळालंय.

हेही वाचा – CRIME | पोलिसानंच रचलं कारस्थान, अंबानींच्या घरासमोर स्फोटकं

पाहा फोटो –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!