Video | जेव्हा सावंत सावंतांना भेटतात…

राखी सावंतने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राखी सावंत. आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आणि आयटम गर्ल. राखीची वेगळी ओळख करुन देण्याची गरजच नाही. राखी सध्या गोव्यात आली आहे. जीवाचा गोवा करता करता राखी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि तिनं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेटही घेतली आहे. या भेटीची चर्चा सध्या रंगली आहे.

हेही वाचा – Video | झुआरी ब्रिजची History TV18कडून दखल! इंजिनिअरींग मार्वल्समध्ये झळकला झुआरी ब्रिज

गोव्यात फिरताना

वेगवेगळे बॉलिवूड सेलेब्रिटी राज्यात अनेकदा येत जात असतात. दरम्यान, सध्या राखी सावंत गोव्याच्या पर्यटनाचा आस्वाद लुटताना आधी कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर तिनं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली आहे. या भेटीचा फोटोही समोर आला आहे.

हेही वाचा – Accident Video | तळीरामाचा प्रताप फार्मसी कॉलेजजवळ ६ गाड्यांना ठोकलं

मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर

गोव्यातील एका क्लबमध्ये राखी सावंतने सूरही आळवलेत. परदेसीयाँ हे गाण गात तिनं क्लबमधील श्रोत्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलाय. गाणं गातानाचा व्हिडीओ राखी सावंतनं शेअर केलाय. बिग बॉस सीझन १४मध्ये सहभागी झाल्यानंतर चर्चेत आलेली राखी सावंत सध्या गोव्यात रिलॅक्स करण्यासाठी आली आहे.

ऐका राखी सावंतचं गाणं

हेही वाचा – नवं शैक्षणिक वर्ष २१ जूनपासून, १० मेपासून उन्हाळी सुट्टी

हेही वाचा – Video | Corona | कोरोनाचा संसर्ग नेमका कुठून झाला? काय म्हणालं WHO?

राखीची फुल टू धम्माल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!