20 तारखेपासून पुन्हा टेक ऑफ, हुबळी-गोवा विमानसेवा सुरु होणार

लॉकडाऊनपासून विमानसेवेवर झाला होता परिणाम

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : लॉकडाऊनपूर्वी दाबोळी विमानतळावर सरासरी ८०ते ८५ विमानांची ये-जा होती.मात्र लॉकडाऊनंतर विमानांची संख्या बरीच कमी झाली होती. ती आता पूर्वपदावर येत असून दररोज सरासरी ६५ विमानांची ये-जा चालू असते. वीकएंडला ही संख्या ७० वर पोहचते असे दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी सांगितले. लॉकडाऊननंतर गोवा-हुबळी-गोवा ही विमानसेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा २० जानेवारीपासून इंडिगो एअरलाईन्स् तर्फे पुन्हा सुरु होणार आहे.

प्रवासी वाढू लागले

उत्तर आणि दक्षिण भारतातील काही राज्यातील विमानसेवा सुरु करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊननंतर देशातील इतर विमानतळाप्रमाणे दाबोळी विमानतळावरील विमानसेवेवर परिणाम झाला होता. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. वीकएंडला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने दाबोळी विमानतळावर मोठा ताण पडू लागला आहे. मात्र प्रवाशांना व्यवस्थितपणे हाताळण्यात येते असे गगन म्हणाले. वीकएंडला प्रवाशांची संख्या १९ ते २०
हजारांवर जाते.

हेही वाचा – WhatsApp ला नवीन पर्याय?

गेल्या रविवारी ये-जा केलेल्या ७० विमानांतील १९हजार ८६२ प्रवाशी हाताळण्यात आले होते. त्यापैकी ८ हजार २२४ इतर राज्यांतून गोव्यात आले होते , तर ११ हजार ६३८ गोव्यातून इतर राज्यांमध्ये गेले होते.

वेळापत्रकात बदल

लॉकडाऊननंतर परिस्थिती ८०टक्के पूर्वपदावर आली आहे. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विमानांच्या संख्येत वाढ होत आहे. एअर बबल अंतर्गत काही आंतरराष्ट्रीय विमानेही दाबोळी विमानतळावर आली होती. विमानांच्या वाढत्या संख्येमुळे आता वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. सकाळी सातऐवजी साडेसहा वाजता पहिले विमान दाबोळी विमानतळावर येत आहे.

एकंदर परिस्थिती पाहता दाबोळी विमानतळावर प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र दिसत असल्याचं त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावरील ७८७ हे विमान विस्तारा एअरलाईन्सतर्फे पहिल्यांदाच दाबोळी विमानतळावर पंधरा दिवस ऑपरेट करण्यात आल्याने हि मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Shripad Naik Accident | ‘शॉर्टकटने गेले नसते तर कदाचित अपघात टळला असता’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!