आंबोली पर्यटन आता पाहता येणार ‘लाईव्ह’! ‘आंबोली टुरिझम’ची अभिनव संकल्पना…

आंबोलीतील पर्यटनस्थळे 'लाईव्ह' दाखवणारे आंबोली टुरिझम ठरणार प्रथमच माध्यम!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आंबोलीसारख्या काही अंशी दुर्लक्षित पर्यटनस्थळला जगाच्या नकाशावर ‘आंबोली टुरिझम’ मार्फत पोहोचवणारे निर्णय राऊत यंदाच्या वर्षा पर्यटनात (हंगामात) कोरोना माहामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘आंबोली वर्षा पर्यटना’चा आनंद प्रत्यक्षात पर्यटकांना लुटायला मिळण्याची जरी शक्यता कमी असली, तरी आपल्या ‘आंबोली टुरिझम’मार्फत ‘आंबोली टुरिझम लाईव्ह’ (वर्षा पर्यटन विशेष) द्वारे सर्व महत्त्वाची पर्यटनस्थळे ऑनलाईन पाहण्याची संधी प्रत्येकाला सोशल मीडिया आणि वेब पोर्टलवर उपलब्ध करणार आहेत, तीही निःशुल्क. असा उपक्रम राबवणारे निर्णय राऊत हे कदाचित प्रथमच युवक ठरण्याची शक्यता आहेत. त्या बद्दल जाणून घेऊया…

प्रथमच आंबोली जागतिक पातळीवर ऑनलाईन सह ऑफलाईन माध्यमातून

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘आंबोली’ हे ठिकाण आता जगभर प्रसिद्ध आहे. तसंच येथील आंबोली घाट मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांना एकत्रित जोडणारा ऐतिहासिक असा राज्यमार्ग आहे. आंबोली हे पर्यटनस्थळ काही वर्षांपूर्वी फक्त वर्षा पर्यटनासाठी राज्यात ओळखलं जायचं. वर्षा पर्यटन हंगामातील तीन महिने येथे पर्यटन चालायचं. पर्यटन हे रोजगाराचं साधन आहे. परंतु, आंबोलीत मुख्य धबधबा, कावळेसाद पॉइंट, महादेवगड पॉइंट, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, नांगरतास धबधबा, सनसेट पॉइंट, शिरगावकर पॉइंट, राघवेश्वर पॉइंट इ. एवढंच ‘साईटसिंग’ करण्यासाठी पर्याय होते. मात्र, निर्णय राऊतने आंबोली परिसरातील पर्यटनवाढीसह तेथे १२ महिने पर्यटन होण्यासाठी, आंबोली परिसराचे महत्व सर्वदूर एका क्लिकवर उपलब्ध तथा रोजगार निर्मिती करिता नि:शुल्क आंबोली टुरिझमची निर्मिती करत. सर्व प्रथम आंबोलीला जागतिक पातळीवर ऑनलाईन सह ऑफलाईन माध्यमातून आंबोली पर्यटनस्थळाला पोहचवले. तसंच १२ महिने पर्यटन करिता अभ्यासपूर्वक येथे विविध योजना तथा संकल्पना राबवल्या.

साहसी पर्यटनचाही पाया रोवला

यात सर्व प्रथम सुरुवात साहसी पर्यटनचाही पाया त्याने रोवला. साहसी पर्यटन एक्टिव्हिटिज, इको टुरिझम, व्हिलेज टुरिझम, कृषी पर्यटन (ॲग्रो टुरिझम), साईटसिन, पर्यटन माहिती केंद्र, टेंट कॅम्पिंग, योगा, मेडिटेशन, पंचकर्मा, बाराही महिने नेचर कॅम्प, बर्ड – बटरफ्लॉय वॉचिंग, जंगल सफारी, नाईट सफर, जंगल ट्रेक, ॲनिमल वॉचिंग, नेचर ट्रेक, पठार ट्रेक, रॉक ट्रेक (बेसिक व हार्ड), बायोडाव्हर्सिटी कॅम्प, स्टडी/रिसर्च कॅम्प, टेंट कॅम्पिंग, जंगल टेंट, लेक साईट टेंट, जंगलातील व शेतातील/जंगल माची ( निगराणी माळा ), कॅम्प फायर, फोटोग्राफी कॅम्प, बैलगाडी सफर, घोडागाडी सफर (चित्रि), जीप सफर, ट्रॅक्टर सफर, मातीच्या घरातील अनुभव, मालवणी घरगुती चुलीवरचे जेवण. त्यासोबत गाईड सर्व्हिस, हॉटेल बुकिंग, घरगुती जेवण, होम स्टे, कार सर्व्हिस आणि आंबोली टू अदर प्लेस टूर व अदर प्लेस टू आंबोली तसेच हिडेन प्लेस आंबोली – चौकुळ – गेळे – कुंभवडे – खडपडे परिसरातील पर्यटनस्थळे एक्सप्लोर करणे, कॉर्पोरेट नेचर कॉन्फरन्स, इव्हेंटस व् आदी १२ महिने उपलब्ध आहेत.

असं असेल आंबोली पर्यटन लाईव्ह.

असंख्य पर्यटकांच्या मागणीमुळे आंबोली टुरिझममार्फत ऑनलाईन सर्व सोशल मीडिया प्लॉटफॉर्म तथा आंबोली टुरिझम अधिकृत वेब पोर्टलवर आंबोलीतील नयनरम्य निसर्ग, विशेषता मनमोहक घनदाट धुके, पावसाळ्यातील फेसळनारा आंबोली मुख्य धबधबा, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र (नदी उगम), महादेवगड पॉइंट/आंबोली घाट, कावळेसाद पॉइंट हे मुख्यतः लाईव्ह तसेच चौकुळ व्हिलेज (पठारे), बाबा धबधबा (कुंभवडे) व आदी हिडेन पॉइंट हेही लाखो पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसंच रात्रीच्या अंधारातील आंबोलीचे विश्व देखील पाहता येणार आहेत. सोबत रात्रीच्या किर्र अंधारातील जीवांचा आवाज आदी. तर यात आंबोली मुख्य धबधबा, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र (नदी उगम), महादेवगड पॉइंट/आंबोली घाट, कावळेसाद पॉइंट हे मुख्यतः लाईव्ह स्ट्रिमिंग केले जातील तर चौकुळ, कुंभवडे परिसरातील पर्यटनस्थळे नियोजना नुसार प्रक्षेपित होणार आहेत. तसंच आंबोली परिसरातील आजवर प्रसिद्धीस न आलेल्या अनेक बाबीसुद्धा सर्वांसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. यासोबत आंबोली, चौकुळ तथा गेळे परिसरातील मूळ स्थानिकांचे कल्चर, कलागुण, वैध, आपत्कालीन प्रशिक्षण, नेचर प्रोग्राम्स, जीवन शैली, मेडिटेशन हेही लाखो लोकांना पाहायला मिळणार आहेत. ‘आंबोली टुरिझम’कडून ‘आंबोली पर्यटन लाईव्ह’ पाहण्यासाठी गेल्या ५ महिन्यांत सुमारे १ लाखांहून जास्त पर्यटकांनी नोंदणी केली आहे. यावेळी पर्यटकांना आपल्या इच्छेनुसार आंबोलीतील त्यांच्या आवडीचीही पर्यटनस्थळं लाईव्ह स्वरुपात पाहता येणार आहे, हे विशेष. मात्र, यासाठी पूर्व नोंदणी अनिवार्य आहे. असा उपक्रम तथा संकल्पना पहिल्यांदाच राबवली जात आहे. जुलै महिन्यापासून ‘आंबोली टुरिझम लाईव्ह’ पाहता येणार आहे. तर सद्या मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता आंबोली टुरिझम लाईव्ह’चा आनंद लाखो पर्यटक / लोकं घेण्याचा अनुमान आहे.

‘आंबोली टुरिझम’ हेल्पलाईन

‘आंबोली टुरिझम’मार्फत आंबोली परिसरातील पर्यटनस्थळाबद्दल संपूर्ण माहिती, आंबोली गाईड,
आपत्कालीन मदत, तत्काळ बुकिंग व इतरकरिता तसेच सिंधुदुर्ग आणि गोवा पर्यटनाकरता सुद्धा विशेष २ हेल्पलाईन नंबर देखील पर्यटकांसाठी 24*7 लवकरच उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचाः अटल सेतूवर अपघात! मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळला

‘आंबोली टुरिझम’ पोर्टल ( संकेतस्थळ ) होणार सुसज्ज आणि परिपूर्ण

‘आंबोली टुरिझम’चे पोर्टल लवकरच अद्ययावत होणार असून इंग्लिश भाषेसह मराठी व हिंदी भाषेतही उपलब्ध होणार आहे. तसंच आंबोलीची अधिकृत सविस्तर माहिती, जैविविधता आणि त्यातील विशेष नोंदी, पर्यटन, फूड्स, कोकण प्रॉडक्ट्स, आवश्यक सेवा, कृषि, हेल्प लाईन आदी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आंबोलीतील औषधी मधासह संपूर्ण सिंधुदुर्गातील प्रॉडक्ट खरेदी करता येणार ऑनलाईन

आंबोली परिसरातील अनेक घरगुती बनवलेले सर्व प्रॉडक्ट ‘आंबोली’ ब्रॅंडखाली ऑनलाईन विक्रीकरिता (भारतभर) उपलब्ध होणार आहेत. यात औषधी मधापासून सर्व जे आंबोली परिसरातील स्थानिकांनी बनवलेले प्रॉडक्ट तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रॉडक्ट हे आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. ज्याने रोजगाराच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकलं जाणार आहे. तसंच मार्केट उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. त्याची तयारीसुद्धा झालेली असून ‘आंबोली टुरिझम’च्या १३ ऑक्टोबर रोजी सदर सेवेचे लाँच होणार आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE |देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट

‘आंबोली टुरिझम’मार्फत आंबोली जागतिक पटलावर आण्याचं कार्य निर्णय राऊत यांनी केलं आहे. आंबोली गावाच्या विकासासाठी पर्यायाने कोकणच्या विकासासाठी ‘आंबोली टुरिझम’ सद्या विविध स्तरावर कार्यरत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!