दूधसागर पर्यटनाला सुरुवात, प्रतिसाद थंड

शॅक उभारणीच्या कामाचाही श्रीगणेशा

Goan Varta Live | प्रतिनिधी

सांगे : एक दिलासादायक बातमी आहे, गोव्यात असलेल्या पर्यटन व्यावसायिकांसाठी…
राज्यातील पर्यटन पुन्हा एकदा बहरु लागलंय. दूधसागर पर्यटनाला सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीला इथं मिळणारा प्रतिसाद हा थंडच आहे.

पहिल्या दिवशी फक्त एकशे दहाच पर्यटक आल्याची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंतही ही सर्वात निच्चांकी पर्यटकसंख्या असल्याचं सांगितलं जातंय. शनिवार रविवारी दूधसागर धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी उसळते. मात्र यंदा कोरोनाचा फटका पर्यटनस्थळांनाही बसलाय. येत्या आठवड्याभरात इथल्या पर्यटनाला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. दुसरीकडे दक्षिण गोव्यातही शॅक उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. देशी आणि परदेशी पर्यटकांना शॅक हे प्रमुख आकर्षण राहिलेलंय. सासष्टीच्या केळशी किनाऱ्यावर व्यावसायिकांची शॅक उभारणीसाठी लगबग सुरु झाली आहे.

यंदा दक्षिण गोव्यासाठी 170 शॅक उभारण्याची परवानगी देण्यात आलीये. त्याप्रमाणे जागाही ठरवून देण्यात आल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यंदा शॅक व्यावसायिकांसाठीच्या शुल्कात तब्बल 50 टक्के कपात करण्यात आली आहे. अजून पर्टकांची गर्दी वाढलेली नाही. मात्र एकदा शॅक उभे राहिल्यावर गर्दी आपोआप वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

पाहा स्पेशल रिपोर्ट

हेही वाचा –

राणेंना बेडूक म्हणणारे उद्धव हे दुसरे ठाकरे!

भाजपच्या फेक न्यूजना फेसबुकवर मोकळं रान!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!