राज्यभर मुसळधार पाऊस; दिवसभर कायम राहणार

हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात सकाळपासूनच  पावसाने जोर धरलाय. राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. हा पाऊस दिवसभर कायम राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे बाहेर पडलेल्यांना प्रवास करताना काळजी घेण्यास सांगण्यात आलंय.

हेही वाचाः राज्यात प्रवेश करणाऱ्यांची मोले चेकपोस्टवर अँटीजेन टेस्ट

दिवसभर कोसळणार पाऊस

शनिवारी सकाळपासून राज्याला पावसाने झोडपून काढलंय. मिनीट भराची विश्रांतीही पावसाने घेतलेली नाहीये. हवामान खात्याकडून देखील यलो अलर्ट जारी करत राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संपूर्ण दिवस हा पाऊस असाच कोसळणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय.

पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता

ओडिशा आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर तयार झालेल्या सर्क्युलेशनमुळे राज्यात पुढील ४ ते ५ दिवस काही भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे येत्या २४ तासांमध्ये ६ इंचापर्यंत पावसाची नोंद शक्य असल्याची माहितीही गोवा हवामान विभागाकडून हाती येतेय.

हेही वाचाः पळा पळा, कोण पुढे पळे तो…

कुठे किती पाऊस पडला?

शनिवारी सकाळपासून राज्याच्या सर्व भागात पाऊस धो धो कोसळलाय. राज्यात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत पणजीत ५४.५, म्हापशात ५०, पेडण्यात ३०, जुने गोवेत ७९, मुरगावात २०.८, तर काणकोणात ३१.५ मिमी पावसाची नोंद झालीये. या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत केलंय.

यलो अलर्ट म्हणजे काय?

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकतं, अशी सुचना जारी करण्यात येते तेव्हा अलो अलर्ट जारी करतात. दैनंदिन कामं रखडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!