TOP TEN CM : ‘हे’ आहेत देशातले सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री

इंडिया टुडे ‘मूड ऑफ द नेशन’नं केला सर्व्हे

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेत सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याना २९ टक्के लोकांची पसंती आहे. तर टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचं नाव आहे. या सर्व्हेत लोकांची मत जाणून घेतल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला आहे. इंडिया टुडे ‘मूड ऑफ द नेशन’नं हा सर्व्हे केला.

सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एमके स्टालिन यांचं नाव आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक दुसऱ्या स्थानावर आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन तिसऱ्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाचव्या क्रमांकावर आहेत. या यादीत भाजपाशासित राज्यातील दोन मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव आहे. दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांचंही या यादीत नाव आहे.

तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम के स्टालिन हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना ४२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांना ३८ टक्के लोकांची पसंती आहे. केरळ मुख्यमंत्री पी विजयन तिसऱ्या स्थानावर असून त्यांना ३५ टक्के लोकांची पसंती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना ३१ टक्के लोकांची पसंती असून ते चौथ्या स्थानावर आहे. ममता बॅनर्जी पाचव्या, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सहाव्या, योगी आदित्यनाथ सातव्या, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आठव्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवव्या, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन दहाव्या, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल अकराव्या स्थानावर आहेत.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता मागील वर्षभरामध्ये तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षी ६६ टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दर्शवली असतानाच यंदा मात्र अवघ्या २४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिलाय. इंडिया टुडेने घेतलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आलीय. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी होण्यामागील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला आलेलं अपयश. “करोनाची पहिली लाट आली तेव्हा पंतप्रधान मोदींची नेता म्हणून लोकप्रियता जानेवारी २०२१ मध्ये ७३ टक्के इतकी होती. मात्र दुसऱ्या लाटेमधील केंद्र सरकारचा कारभार आणि त्यामुळे सर्वसामान्यांना झालेल्या अडचणी यामुळे मोदींची लोकप्रियता ४९ टक्क्यांनी कमी झालीय,” असं इंडिया टुडेच्या या सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!