TOP 25 | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या झटपट

महत्त्वाच्या 25 घडामोडी एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

1 ७८ जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव
आतापर्यंत ७८ जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव सर्वांधिक गुन्हेगार मडगाव, फातोड्यातून, तडीपार करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती समोर

2 मुंबई एनसीबीचे गोव्यात छापे
मुंबई एनसीबीचे गोव्यात छापे, ड्रग्जचा मोठा साठा जप्त; अनेकांना अटक, रविवारी उशिरापर्यंत कारवाईचा धडाका, मिरामार परिसरात तर आसगाव-हणजुणे येथील ठिकाणी छापेमारी

3 सीझेडएमपीच्या सुनावणीत गोंधळ
पणजीच्या कलाअदकादमीमध्ये सीझेडएमपीच्या सुनावणीत गोंधळ, प्रशासकीय अधिकाऱ्यांना वैतागूत अनेकांचा सुनावणीतून काढता पाय, तर दुपारच्या सत्रात निषेध व्यक्त करत मांडल्या सूचना

4 जनसुनावणी परवानगी न घेता केल्याचा आरोप
आचारसंहिता लागू असताना, कोणतीच परवानगी न घेता जनसुनावणी आयोजित करण्यात आल्याचा आरोप, इतिहासतज्ज्ञ प्रज्वल साखरदांडे यांचा दावा, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले, जनसुनावणीला राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात आली असल्याचं स्पष्टीकरण

5 रवींद्र भवनाबाहेर शेकडो लोक रस्त्यावर
रवींद्र भवनाबाहेर शेकडो लोक रस्त्यावर, अनेकांना प्रवेश नाकारल्याने सभागृहातही जनसुनावणीस विरोध, शेकडोंच्या संख्येने गेटबाहेर जमलेल्या नागरिकांनी निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणला

6 जनसुनावणीवरुन विरोधकांची सडकून टीका
जनतेच्या सहभागाशिवाय होणारी ही पहिलीच जनसुनावणी, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव यांची टीका, जनसुनावणी पुढे ढकलून सर्व लोकांना बोलावून ती पुन्हा घेण्याची विरोधी पक्षाच्या आमदारांची मागणी

7 शेकडो लोकांचा पोलिसांविरोधात रोष
मडगावातील रविंद्र भवनाबाहेरीतल पोलिसांचे सुरक्षाकडे तोडण्याचा प्रयत्न, रवींद्र भवनच्या बाहेर बसलेल्या शेकडो लोकांचा पोलिसांविरोधात रोष, धक्काबुक्कीमुळे मोठा तणाव

8 काळे बावटे दाखवून बाबू आजगांवकरांचा निषेध
धारगळात आंदोलकांकडून उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकरांचा निषेध, काळे बावटे दाखवून दिल्या घोषणा, मोपा महामार्ग रद्द करण्याची मागणी, राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा महामार्गाला तीव्र विरोध

9 मोरजीत ३४० महिलांचा मगोत प्रवेश
मोरजीत ३४० महिलांचा मगोत प्रवेश, मोरजीतील देशप्रभू सभागृहात झालेल्या ‘स्त्रीत्व’ या विशेष कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी महिलांना पक्षात रीतसर एन्ट्री, युवा नेते जीत आरोलकर यांनी घडवून आणला भव्य कार्यक्रम

10 पेडण्यात भाजपा पेनलला स्वकीयाकडून धोका
पेडणे नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा पेनलला स्वकीयाकडून धोका , ५० टक्के यश मिळण्याची शक्यता, निष्ठावंत भाजपला वगळून इतर पक्षाच्या उमेदवाराना उमेदवारी दिल्यानं नाराज कार्यकर्ते बंडखोरीच्या तयारीत

11 रमेश नाईकांची दिगंबर कामतांनी घेतली भेट
केपे नगरपालिकाच्या प्रभाग एकमधून अर्ज सादर केलल्या रमेश नाईकांची दिगंबर कामतांनी घेतली भेट, भाजप समर्थकांनी उप जिल्हाधिकारी कार्यालयात समोर अडवून धरल्याने रमेश नाईक चर्चेत, भेट घेऊन रमेश नाईकांना सोबत असल्याची दिगंबर कामत यांनी दिली ग्वाही

12 गोमंतकीयांना रस्त्यावर उतरणं आवडत नाही- राऊत
गोमंतकीयांना रस्त्यावर उतरणं आवडत नाही, संजय राऊतांचा गोव्यातील लोकांना खोचक टोला, आंदोलनाशिवाय झोपलेल्या सरकारला जाग येणं अशक्य असल्याचं वक्तव्यस पणजीतील पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रखर टीका

13 चोडणकरांची केंद्र सरकारवर टीका
विदेशात असलेल्या भारतीय नागरिकांवर निर्बंध घालून त्यांची मातृभूमीशी नाळ तोडण्याचा सरकारचा डाव, काँग्रेस नेते गिरीश चोडणकरांचा भाजप सरकारवर हल्लाबोल, केंद्रीय गृहमंत्रालयानं 4 मार्च रोजी काढलेल्या अधिसूचनेवर चोडणकर यांचा आक्षेप

14 संगीत तज्ञ भाई शेवडे यांचा सत्कार
संगीत तज्ञ भाई शेवडे यांचा सत्कार, पंडित अजित कडकडे यांच्या हस्ते पार पडला सत्कार सोहळा, भाई शेवडे हे संगीतातले रसायन, अजित कडकडे यांची स्तुतिसुमनं

15 नासाच्या गाडीची मंगळावर सफर
नासाच्या गाडीची मंगळावर सफर, 33 मिनिटांच्या सफारीमध्ये एकूण 6.5 मीटर अंतर गाडीनं कापलं, नासाच्या खास बग्गीसारख्या गाडीनं मंगळाच्या पृष्ठभागावर पूर्ण केला पहिला फेरफटका

16 9 एप्रिलपासून रंगणार आयपीएल
9 एप्रिलपासून रंगणार आयपीएल 2021चा थरार, 30 मे ला फायनल, मुंबई आणि बंगळुरुमध्ये होणार सलामीची लढत, दोन वर्षानंतर भारतात रंगणार आयपीएल सामने

17 विनेश फोगाटची पुन्हा एकदा गोल्डन कामगिरी
कुस्तीपटू विनेश फोगाटची पुन्हा एकदा गोल्डन कामगिरी, आठवड्याभरात पटकावलं सलग दुसरं सुवर्णपदक, माटियो पॉलिकोन, रँकिंग कुस्ती सीरीजमध्ये पटकावलं अव्वल स्थान

18 पीव्ही सिंधू स्वीस ओपनमध्ये उपविजेती
पीव्ही सिंधू स्वीस ओपनमध्ये उपविजेती, गोल्ड मेडलिस्ट कॅरोलिना मारिनविरुद्धच्या एकतर्फी लढतीत सिंधूचा पराभव, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या मारिननं पटाकवलं वर्षातलं पहिलं जेतेपद

19 महिला क्रिकेट संघाचा लाजीरवाणा पराभव
दक्षिण अफ्रिकेनं भारतीय महिलांना 8 विकेट्सनं धूळ चारली, जवळपास वर्षभरानंतर आंतराराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा लाजीरवाणा पराभव,

20 तीन बॉक्सर्स अंतिम फेरीपासून वंचित
भारताला बसली कोविडची झळ, तीन बॉक्सर्स अंतिम फेरीपासून वंचित, एक खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे 35 व्या बॉक्साम इंटरनॅशनल स्पर्धेच्या अंतिम फेरीतून माघार

21 प्रदर्शनापूर्वीच गंगूबाई काठियावाडी वादात
प्रदर्शनापूर्वीच गंगूबाई काठियावाडी वादात, संजय लिला भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या कथेवर आक्षेप घेण्यात आल्यानं वाद, कामाठीपुरातील 200 वर्षांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप

22 ‘गोदावरी’ची रीलिज डेट ठरली
जितेंद्र जोशी याची मुख्य भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमाची रिलीज डेट ठरली, ३० एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार गोदावरी सिनेमा

23 बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल ऑन ड्यूटी
बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल करतेय ड्यूटी, अभिनेत्री स्वरा भास्करनं शेअर केला व्हिडीओ, चंढीगढमधील व्हिडीओची ट्वीटवर चर्चा

24 मी क्रोबा, एक दंशही पुरेसा – मिथुनदा
मी क्रोबा, एक दंशही पुरेसा; भाजपात दाखल होताच मिथून चक्रवर्तींचा इशारा, अप्रत्यक्षपणे मिथून चक्रवर्तींचा तृणमूल काँग्रेसवर निशाणा

25 हेलिकॉप्टर अपघातात अरबपतीचा दुर्दैवी मृत्यू
फ्रान्सचे अरबपती आणि खासदार ओलिवयर डसॉल्ट यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू, फ्रान्स राष्ट्रपतींनी व्यक्त केलं दुःख

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!