TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर | 5 मिनिटांत 25 बातम्या

महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

१ खाणबंदीला तीन वर्ष पूर्ण
खाणबंदीला तीन वर्ष पूर्ण, तीन वर्षात महसुलात मोठी तूट, बेरोजगारीही वाढली, अवलंबितांचं भविष्य अधांतरी, खाण प्रश्न कधी सुटणार, याची प्रतीक्षा कायम इथे वाचा सविस्तर बातमी

२ खाण अवलंबितांचं आंदोलन तूर्तास पुढे
निवडणूक आचारसंहितामेुळे खाण अवलंबितांचं आंदोलन तूर्तास पुढे ढकललं, 15 मार्चपर्यंत देण्यात आलेला अल्टिमेटम आचारसंहितेमुळे स्थगित, निवडणूक झाल्यानंतर पुन्हा आंदोलन पेटण्याची शक्यता

३ राज्य निवडणूक आयुक्तपदी नावतींच्या नाव निश्चित
राज्य निवडणूक आयुक्तपदी नारायण नावतींच्या नावावर शिक्कामोर्तब, राज्यपालांनीही नावती यांच्या नावाल मंजुरी दिल्याची माहिती, चोखाराम गर्ग यांच्या राज्य निवडणूक आयुक्त पदाच्या राजीनाम्यानंतर नावतींकडे पदभार जाणं जवळपास निश्चित, इथे वाचा सविस्तर बातमी

४ पालिका आरक्षणाबाबत मामलेदारांसोबत बैठक
आरक्षणात पुन्हा घोळ घालाल तर खबरदार, विरोधी पक्षांचा सरकारसह राज्य निवडणूक आयोगाला सज्जड ईशारा, आज मामलेदारांसोबत बैठक होणार , 5 पालिकांच्या निवडणुकांच्या नव्यानं जाहीर होणाऱ्या आरक्षणाकडे राज्याचं लक्ष

५ आता पर्यटन खातं एनसीबीच्या रडारवर
वागातोर रेव्ह पार्टीनंतर पर्यटन खातं एनसीबीच्या रडारवर, मुंबई एनसीबीनं उचलला गोव्यातील ड्रग्ज उच्चाटनाचा विडा, बंदी असूनही खुलेआम शॅकवर पार्ट्यांचं आयोजन होत असल्यानं स्थानिक पोलि, आणि प्रशासकीय यंत्रणेसह पर्यटन खातं आणि पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारीही एनसीबीच्या निशाण्यावर, इथे वाचा सविस्तर बातमी

६ हरमलमध्ये गांजा आणि चरससह एकाला अटक
हरमलमध्ये गांजा आणि चरससह एकाला अटक, पेडणे पोलिसांची कारवाई, मुळच्या बंगळुरुत एकाला अटक, 20 हजार रुपयांचे अंमली पदार्थ पोलिस कारवाईत जप्त

७ न्हावेलीतील जनसुनावणीमध्ये प्रचंड गोंधळ
न्हावेलीतील जनसुनावणीमध्ये प्रचंड गोंधळ, रविवारी पोलिस बंदोबस्तात पार पडली सेसा गोवा वेदांता कंपनीच्या विस्तार प्रकल्पावर जनसुनावणी, स्थानिकांचा विस्ताराला विरोध

८ वेतन न मिळाल्यानं कामगारांचं आंदोलन
वेतन न मिळाल्यानं कामगारांचं आंदोलन, झुआरी पुलाचं काम पुन्हा रखडण्याची शक्यता, अडीच महिन्यांचा पगार न मिळाल्यानं कर्मचारी वर्ग नाराज

९ अधिवेशनासाठी श्रीपाद नाईक दिल्लीत
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक दिल्लीला रवाना, दिल्लीत सुरु असलेल्या अधिवेशनासाठी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक राजधानीत दाखल, अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्रीपाद नाईक यांना दीड महिन्यांच्या प्रदीर्घ उपचारानंतर देण्यात आला होता डिस्चार्ज

१० वाळपईचं तापमान सर्वाधिक, गोवेकर घामघूम
वाळपईचं तापमान सर्वाधिक असल्याची नोंद, पारा तब्बल 38 पूर्णांक 5 अंशांवर, गेल्या 8 वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद, वाढत्या उकाड्यानं गोवेकर घामाघूम

११ राज्यातील कोरोना मृतांचा आकडा 806वर
राज्यात रविवारी कोरोनामुळे आणखी एका मृत्यूची नोंद, मृतांचा आकडा 806वर पोहोचला, तर नव्या 66 रुग्णांची रविवारी भर, राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संक्याही 749वर

१२ नोकरीच्या आमिषानं फसवणारा गजाआड
जहाजावर नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक करणारा गजाआड, सायबर क्राईम विभागाची कारवाई, संशयीत आरोपी सुमीत उपाध्यायच्या मुंबईत मुसक्या आवळल्या

१३ भाषा माध्यम आंदोलन पुन्हा तीव्र होणार
भारतीय भाषा सुरक्षा मंचचा मातृभाषा बचावासाठी नव्याने एल्गार, 1 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंत 18 ही प्रभागात धरणा कार्यक्रम, भाषा माध्यम आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा

१४ मार्जोड्यात आरजीची कॉर्नर मीट
गोवेकर कोण याची व्याख्याच निश्चित नाही, मनोज परबांचा हल्लाबोल, माजोर्ड्यामध्ये झालेल्या आरजीच्या सभेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

१५ होमलोन रद्द केल्याच्या निर्णयाचं आव्हान वर्ज
सरकारी होमलोन रद्द केल्याच्या निर्णयाला न्यायालयीन आव्हान वर्ज, होमलोन रद्द निर्णयाच्या परिणामांना राज्य सरकार जबाबदार राहणार नाही. सरकारकडून अधिसुचना जारी

१६ सचिन वाझे यांनी एनआयएकडून अटक
मनसुख हिरेन प्रकरणी सचिन वाझे यांनी एनआयएकडून अटक, तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझेंना अटक

१७ अटकेनंतर सचिन वाझेंची प्रकृती बिघडली
सचिन वाझेंची प्रकृती बिघडली, रविवारी मध्यरात्री डॉक्टरांकडून उपचार, रविवारी करण्यात आलेल्या अटकेनंतर सचिन वाझे 11 दिवसांची कोठडी

१८ महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात 16 हजार 620 कोरोना बाधितांची नोंद, तर 50 रुग्णांचा मृत्यू, झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णवाढीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन

१९ बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर
खासगीकरणाविरोधात देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा आज संप, दोन दिवसांच्या संपामध्ये तब्बल दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होण्याची शक्यता

२० दुसऱ्या टी-20मध्ये भारताचा विजय
दुसऱ्या टी-20मध्ये भारताचा विजय, इंग्लडविरुद्धची 5 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत, 164 धावांचा पाठलाग करताना भारताचा इंग्लंडवर 7 गडी राखून शानदार विजय

२१ पदार्पणातच चमकला इशान किशन
पदार्पणाच्या पहिल्याच सामना इशान किशन चमकला, अर्धशतकी खेळी तुफान फटकेबाजी करत इशान किशननं जिंकली चाहत्यांची मनं

२२ रनमशिन कॅप्टन कोहली पुन्हा फॉर्मात
दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली फॉर्मा, नाबाद 73 धावा करत विराटची जबरदस्त खेळी, रनमशीन विराट कोहली पुन्हा फॉर्मात आल्यानं टीम इंडियाला दिलासा

२३ भारतीय महिला क्रिकेट संघाचा पुन्हा पराभव
भारतीय महिला क्रिकेट संघाचा पुन्हा पराभव, भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेची अपराजित आघाडी, 6 विकेट्स राखून चौथ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर शानदार विजय

२४ विजय हजारे चषकावर मुंबईनं कोरलं नाव
विजय हजारे चषकावर मुंबईनं कोरलं नाव, उत्तर प्रदेशचा पराभव करत मुंबई विजयी, आदित्य तारेची मुंबईसाठी शतकी खेळी, तर कर्णधार पृथ्वी शॉचंही शानदार अर्धशतक

२५ भाच्यानं माझं नाव खराब केलं- गोविंदा
भाच्यानं माझं नाव खराब केलं, गोविंदाचा विनोदी अभिनेता कृष्णावर हल्लाबोल, गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या गोविंदा आणि कृष्णा वादाला पुन्हा फोडणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!