Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

१ 5 पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मडगाव, म्हापसा, मुरगाव, केपे आणि सांगे नगरपालिकांची निवडणूक 21 मार्चला, अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 6 मार्चला, राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर. आचारसंहिता लागू, सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयायवर स्थगिती घालताच निवडणूक कार्यक्रम तातडीनं जाहीर

२ मंगळवारी पालिका निवडणुकीवर सुप्रीम सुनावणी

निवडणूक नव्याने जाहीर करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयवर स्थगिती दिल्यानंतर आता येत्या मंगळवारी सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, अंतिम सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

३ खाण संघटनांच्या शिष्टमंडळाच्या सूचना
गोवा खनिज निर्यातदार संघटना आणि गोवा खाण संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट; अर्थसंकल्पासाठी सुचनांचे निवेदन सादर

४ ‘कोणतीही थकबाकी कंपनीकडे नाही’
खाण कामगारांची कोणतीही थकबाकी कंपनीकडे नाही.2015 मध्ये कामावरून कमी केलेल्यांची सर्व रक्कम अदा, फोमेंतो कंपनीचा कुड्डेगळ खाण प्रकरणी दावा

५ तरुणांचा कोविडमुळे मृत्यू, राज्यात खळबळ
राज्यात 13 वर्षाच्या आणि 38 वर्षांच्या दोघांचा कोविडमुळे मृत्यू, तरुणांच्या मृत्यूनं राज्याच एकच खळबळ, तर नव्या 69 कोविड रूग्णांची नोंद

६. पीएफचा व्याजदर जैसे थेच

पीएफचा व्याजदर जैसे थेच, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेची आर्थिक वर्ष२०२०-२१ च्या व्याजदरासंदर्भात मोठी घोषणा, ईपीएफओच्या निधीवर ८.५० टक्के व्याज, श्रीनगरमध्ये झालेल्या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा

७. ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी – सुप्रीम कोर्ट

ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जातेय; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता, ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेली नियमावली सर्वोच्च न्यायालय पाहणार

८. 15 दिवसांतली तिसरी मोठी कारवाई

क्राईम ब्रांचची मोठी कारवाई, म्हापसा बस स्थानकावरुन 4 लाख 34 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त, मूळच्या अहमदनगरमधील असलेल्या एकाला अटक, गेल्या 15 दिवसातली तिसरी मोठी कारवाई

९. मी बंडखोर नाही- उत्पल पर्रिकर

पणजी महानगरपालिका निवडणुकीत माझा कोणत्याही पॅनलला पाठिंबा नाही, भाजपच्या काही निष्ठावंत उमेदवारांना माझा वैयक्तीक पाठिंबा आहे, मात्र मी त्यांची नावं जाहीर करू शकत नाही, पक्ष श्रेष्ठींकडे माझी भूमिका मांडली, उत्पल पर्रीकरांची स्पष्टोक्ती

 1. दाजी साळकरांची आल्मेदांवर टीका

वास्को मासळी बाजाराचे नूतनीकरण पूर्ण, आमदार आल्मेदांकडून मासळी बाजाराची पाहणी, लवकर विक्रेत्यांना बाजारात जागा देणार असल्याचं आमदारांचं आश्वासन, इतराचे प्रकल्प स्वतःचे म्हणवण्याची आल्मेदांची जुनी सवय, दाजी साळकरांची आल्मेदांवर टीका

११. जीएमसीत मोफत औषधांसाठी लोकांची झुंबड

जीएमसीत मोफत औषधांसाठी लोकांची झुंबड, परिस्थिती हाताळताना सुरक्षा रक्षकांची तारांबळ,

१२. रवी नाईक यांनी घेतली कोविड लस

फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी घेतली कोविड लस, फोंडा उपजिल्हा हॉस्पिटलात डॉ. कुवेलकरांच्या उपस्थितीत पार पडलं लसीकरण

 1. राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून ‘टोल वसुली

राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून ‘टोल वसुली’; नाना पटोलेंचा विधानसभेत गंभीर आरोप, भाजपच्या राम मंदिर निधी संकलन अभियानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांची जोरदार टीका

 1. भाजपची केरळात मोठी घोषणा

भाजपची केरळात मोठी घोषणा, मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा असणार मेट्रोमॅन ई श्रीधरन, केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांची माहिती, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

 1. कृषी कायद्यांविरोधात भाजप खासदार राजीनामा देणार

कृषी कायद्यांविरोधात लवकरच भाजप खासदार राजीनामा देणार, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा दावा, महिन्याभरातच भाजप खासदार राजीनामा देणार असल्याच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

 1. संजय राठोडांची गच्छंती निश्चित
  संजय राठोडांची गच्छंती निश्चित; राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची सही, आता राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार
 2. ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा; तरुण ताब्यात, मूळचा फिरोजाबादचा असणाऱ्या तरुणाने फोन करुन बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली

 1. इंडियन आर्मीच्या स्पेशल फोर्सचं थरारक प्रशिक्षण

इंडियन आर्मीच्या स्पेशल फोर्सचं थरारक प्रशिक्षण कॅमेऱ्यात कैद, इंडियन आर्मीनं जारी केला व्हिडीओ

 1. आर्किटेक्ट असलेल्या अवलियाची पंजाबमध्ये कमाल

पंजाबमध्ये एका अवलियानं जेटच्या डिझाइनमध्ये साकारली कार, ताशी 15 ते 20 किमी वेगानं धावण्याची क्षमता, आर्किटेक्ट असलेल्या अवलियाची पंजाबमध्ये कमाल

20 इंग्लंडचा संपूर्ण संघ २०५ धावांवरच गारद

चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाज चमकले, इंग्लंडचा संपूर्ण संघ २०५ धावांवरच गारद, तिसऱ्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर मैदानात उतरलेल्या इंग्लडच्या खेळाडूंचं चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातही सपशेप लोटांगण, चौथ्या कसोटीत बेन स्टोक्सचं अर्धशतक, बेन स्टोक्स आणि डॅन लॉरेन्स यांच्या संघर्षमय खेळीनं इंग्लंडची लाज वाचवली

22 बुमराह महाराष्ट्राचा जावई होणार की साउथचा?

बुमराह महाराष्ट्राचा जावई होणार की साउथचा? इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराहने घेतली माघार, लग्नासाठी सुट्टी घेतली असल्याची सोशल मीडियात चर्चांना उधाण

 1. अभिनेता फहद फासिलच्या नाकाला दुखापत

स्टंट दरम्यान उंचीवरुन पडल्यामुळे अभिनेता फहद फासिलच्या नाकाला दुखापत, ‘मलयानकुंजू’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडला अपघात, डॉक्टरांकडून विश्रांती घेण्याचा सल्ला

 1. श्रेया घोषाल होणार लवकरच आई

श्रेया घोषाल होणार लवकरच आई, आधीच सांगितलं बाळाचं नाव, बेबी बंपसह शेअर केला फोटो

25 नेदरलॅन्डच्या कोरोना पडताळणी केंद्रात ब्लास्ट

नेदरलॅन्डच्या कोरोना पडताळणी केंद्रात ब्लास्ट, देशी बॉम्बचे पुरावे सापडल्यानं एकच खळबळ, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र ब्लास्टनंतर अलर्ट जारी

25 ग्रीसमधील शहरं भूकंपानं हादरलं,

ग्रीसमधील शहरं भूकंपानं हादरलं, अनेक घरांची पडझड, कोट्यवधींचं नुकसान, भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अनेक गाड्यांचा चक्काचूर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!