TOP 20 | One Liners | एका वाक्यात बातमी!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
१ आजपासून राज्यात कर्फ्यू लागू झाला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नव्या नियमांचं नोटिफिकेशनही जारी करण्यात आलं आहे. वाचा काय सुरु काय बंद!
२ शनिवारी राज्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा हा ३ हजारापेक्षा जास्त होतास मात्र नव्या ३, ७५१ रुग्णांची भरही पडली आहे. वाचा सविस्तर आकडेवारी
३ कोरोनाच्या विरोधातील लढाईला आता अधिक बळ येणार आहे, कारण डीजीसीआयनं आणखी एका औषधाच्या आत्पकालीन वापराला मंजुरी दिली आहे. वाचा सविस्तर
४ केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मोठा निर्णय घेत कोविड संबंधीच्या राष्ट्रीय धोरणात बदल केला असून यापुढे रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी कोविड चाचणी बंधनकारक नसेल. वाचा सविस्तर बातमी
५ फ्रंटलाईन वर्कर्सच्या यादीत आता आणखी काही कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. कुणाकुणाला यादीत टाकण्यात आहे, वाचा सविस्तर
६ राज्यात ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्यभरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
७ फोंड्यातील बाजारात दुकानांमध्ये गर्दी झाल्यामुळे अखेर ही दुकानं पोलिसांनी बंद केली आहेत. वाचा सविस्तर
८ कोविड-१९ रूग्णांवर उपचार करणाऱ्या इस्पितळांसाठी ठराविक एजन्सींकडे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील, असे सीएमओ कार्यालयाने घोषित केलंय.
९ केंद्राकडून गोव्याला 200 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स मिळाले असून दुपारी हे खास विमान गोव्यात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत.
१० गोवा शिख संघटनेचा स्तूत्य उपक्रम राबवत जीएमसीतील कोविड रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय केली आहे. त्यासाठी संपर्क- 9657536238, 9823645350,8668520035
११ पेडण्यातील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत चोडणकर यांच्या अटकेमुळे चर्चांना उधाण आलं असून संताप व्यक्त केला जातो आहे.
१२ संपूर्ण देशात सलग दुसऱ्या दिवशी ४ लाखाहून नवे रुग्ण आढळले असून पुन्हा एकदा ४ हजारपेक्षा जास्त जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर
१३ कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवीर हिरावले आहेत. वाचा सविस्तर
१४ अभिनेता सूरज थापरला आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर
१५ गोमूत्र प्यायल्यानं कोरोना जातो, असा दावा करणाऱ्या भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाहा सविस्तर बातमी.
१६ तुरुंगातही कोरोना संसर्गाची भीती वाढल्यानं काही कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. वाचा सविस्तर
१७ कडक निर्बंध आणि कर्फ्यूमुळे राज्यातील किनारे सुने-सुने झाले आहेत. पाहा खास फोटोस्टोरी
१८ सकारात्मक बातमी – तरुण उद्योजकानं किमया करत देशाला तब्बल ६३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्लांट दिले आहे. वाचा सविस्तर
१९ लसीकरणाच्या नावानं घरात शिरुन चोरी केल्याची धक्क्दायक घटना मुंबईत घडली आहे. वाचा सविस्तर
२० अखेरच जगाचं टेन्शन संपलं असून चीनचं रॉकेट हिंदी महासागरात कोसळलं आहे. वाचा सविस्तर बातमी