धाकधूक संपली! निकाल लागला, पण 10वीच्या निकालातील या 10 गोष्टी तुम्ही वाचल्या का?

दहावीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : ज्या निकालाची दहावीचे विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत होते, तो निकाल अखेर लागलाय. गोवा बोडार्नं पत्रकार परिषद घेत या निकालाची माहिती दिलीये. पर्वरी इथं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दहावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. दहावीच्या निकालाकडे संपूर्ण राज्यातील विद्यार्थी पालकांचं लक्ष लागलं होतं.

कोरोनामुळे रद्द करण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल इंटरनल मार्कांच्या आधारावर देण्यात आलाय. यंदा दहावी बोर्डाचा निकाल हा ९९.७२ टक्के इतका लागलाय. या निकालात विद्यार्थींनी बाजी मारली आहे ९९.९८ टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९९.५० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे राज्यातील सांगे आणि धारबांडोदामध्ये दहावीचा शंभर टक्के निकाल लागल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. दरम्यान, आयटीआय आणि खासगी विद्यार्थ्यांना शालान्त मंडळाची परीक्षा द्यावीच लागणार असल्याचं गोवा बोर्डाच्या अध्यक्षांनी म्हटलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गोवा बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावीचे निकाल विद्यार्थी आणि पालकांना पाहता येतील.

हेही वाचा : बरोबर ८ महिन्यानंतर तो दिवस उजाडला, ज्या दिवशी एकही कोरोना बळी नाही!

दरम्यान, गेल्या दोन दशकात पहिल्यांदाच दहावीचा निकाल बारावीच्या निकालाआधी लागला आहे. याआधी २०००साली दहावीचा आधी बारावीच्या निकालाच्या आधी लागला होता. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसलेल्या बोर्डाच्या परीक्षांमुळे यंदा दहावीचा निकाल बारावीच्या आधी लागल्याची माहिती गोवा बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली आहे.

दहावीच्या निकालातील १० महत्त्वाच्या गोष्टी –

१ दहावीचा निकाल इंटरनल मार्कांच्या आधारावर देण्यात आला आहे.

२ ज्या विद्यार्थांना अपेक्षित गुण मिळालेले नाही, त्यांचं पुर्नमुल्यांकन केलं जाणार आहे.

३ अकरावी विज्ञान शाखेसाठी परीक्षा घेऊन इच्छिणाऱ्यांची प्रवेश प्रकिया नोंदणी सुरु झाली आहे.

४ ६ हजार ४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती भगिरथ शेटये यांनी दिली आहे.

५ गोवा बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी शुल्क घेतलं जाणार नाही आहे.

६ विज्ञान आणि विशिष्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रवेश परीक्षा देणं बंधनकारक असणार आहे.

७. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या ५ वर्षांत जेव्हा लेखी परीक्षा घेतली जात होती, त्यावेळी लागलेला दहावीचा निकाल किती होता याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यावर एक नजर टाकल्यास यंदा इंटरनल मार्कांच्या आधारावर देण्यात आलेल्या गुणांचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला असून उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणातही घसघशीत वाढ झाली आहे.

२०१६चा निकाल – ९०%
२०१७चा निकाल – ९१.५७%
२०१८चा निकाल – ९१.२७%
२०१९चा निकाल – ९२.४७%
२०२०चा निकाल – ९२.६९%

८. आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल २०२१मध्ये लागलाय.

९. विक्रमी विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेला बसले होते. दरम्यान, यंदा फक्त दोनच मुली परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नाही आहे. त्यामुळे जवळपास १०० टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्यात. तर ६५ विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मुल्यांकनाला सामोरं जावं लागणार आहे.

१०. तीन आठवड्यांनंतर सप्लिमेंटरी परीक्षा घेण्याचं नियोजन शाळांनी करावं, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा : …आधी नेटवर्क द्या, मगच ऑनलाईन शिक्षण सुरू करा !

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!